tones valley tourism uttarakhand
sakal
उत्तराखंडमधील ऋषिकेश, मसुरी, नैनिताल किंवा केदारकांठा यांसारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे दरवर्षी पर्यटकांच्या अलोट गर्दीने ओसंडून वाहत असतात. अशा कडक उन्हाळ्यात जर तुम्ही शांत, निसर्गरम्य आणि गर्दीमुक्त (Crowd-Free) पर्वतीय सुट्टीचा आनंद घेण्याचा विचार करत असाल, तर उत्तराखंडचे एक छुपे खोरे आता जागतिक स्तरावर प्रकाशझोतात येत आहे.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर, पश्चिम हिमालयाच्या कुशीत वसलेली 'टोन्स व्हॅली' (Tons Valley) ही सध्या भारतातील सर्वात रोमांचक आणि साहसी पर्यटन स्थळ (Adventure Destination) म्हणून उदयास येत आहे.