Kumbh Mela 2025: ज्येष्ठ नागरिकांना महाकुंभला घेऊन जात असाल, तर 'या' चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Keep in Mind When Taking Elderly to Kumbh Mela : महाकुंभ 2025 प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी आहे. महाकुंभ मेळाव्यात 40 कोटींहून अधिक भाविक आले आहेत. जर तुम्ही आपल्या परिवारातील ज्येष्ठ नागरिकांना महाकुंभात संगमाच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी घेऊन जाण्याचा विचार करत असाल, तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे
महाकुंभ हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा धार्मिक समारंभ आहे, ज्यात देशभरातूनच नाही तर विदेशांमधूनही लाखो भक्त एकत्र येतात. साधू-संतांची अद्भुत रूपं पाहता येतात, तर श्रद्धापूर्वक नदीत डुबकी घेणारे भक्त त्यांची श्रद्धा प्रकट करत असतात.