पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवाईने नटलेला, फेसाळलेला 'गवळीदेव धबधबा'!

गवळीदेव धबधब्याला येथील नागरिक ‘घणसोली टेकडी’ही म्हणतात.
gavalidev falls
gavalidev fallsesakal
Updated on
Summary

गवळीदेव धबधब्याला येथील नागरिक ‘घणसोली टेकडी’ही म्हणतात.

घणसोली (नवी मुंबई ): घनदाट जंगलातून जाणारी पायवाट, पक्ष्यांचा किलबिलाट, उंचावरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा, हिरवाईने नटलेला डोंगर असे वर्णन केले तर मुंबईपासून दूर असे ठिकाण डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, असाच परिसर नवी मुंबई शहरातही आहे. घणसोली शहराच्या पूर्व सीमेवर कल्याण आणि नवी मुंबईच्या मध्यभागी ‘घणसोलीचा वॉटरफॉल’ म्हणजेच ‘गवळीदेव धबधबा’आहे. गवळीदेव धबधब्याला येथील नागरिक ‘घणसोली टेकडी’ही म्हणतात.

gavalidev falls
श्रावण विशेष : अध्यात्माची अनुभूती देणारी चिंचगाव टेकडी !

नवी मुंबईतील घणसोलीजवळील गवळीदेव धबधबा पर्यटनस्थळाचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडावे, असा निसर्गसौंदर्य या परिसराला लाभला आहे. एका बाजूला औद्योगिक परिसर असल्याने या ठिकाणी धबधबा असेल, असे कुणाला वाटणारही नाही. पण, हा डोंगर जसजसा वर चढत जातो, तसतशी येथील निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईचे दर्शन होत जाते. काहीसा डोंगर चढल्यानंतर समोर दिसतो तो उंच कड्यावरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा. या धबधब्यावर येण्याचा सर्वोत्तम वेळ पावसाळ्यात असतो. अन्यथा, इतर ऋतुमध्ये हा धबधबा एक शांत टेकडी म्हणून ओळखली जाते. हिवाळा आणि उन्हाळ्यात सभोवतालचे जंगल क्षेत्र फिरता येऊ शकते.

gavalidev falls
भारतातील अशी टेकडी जिथे बंद कार खाली नव्‍हे तर वर चढते..काय आहे रहस्‍य

गवळीदेव धबधबा अर्थात घणसोली टेकडीवर एक लहान गवळी-देव मंदिर आहे. त्याच्याजवळच पिकनिक स्पॉट आहे. या ठिकाणावरील सर्वांत मोठा धबधबा मंदिराच्या अगदी खाली उगम पावतो. मंदिरापर्यंतचा मार्ग अतिशय सोपा आणि सुंदर आहे. काही कुटुंब सहसा मंदिर ठिकाणी राहतात. ते कुटुंब मासेमारी करतात आणि गोड्या पाण्यातील खेकडे पकडतात. घणसोली टेकडीवरील सर्वांत चांगला भाग मंदिरानंतर सुरू होतो. घनदाट जंगल, दोन्ही बाजूला उंच उंच व डेरेदार वृक्ष आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे पायवाटेने चालताना एक वेगळीच मजा येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com