Holi Celebration : कुठं लाठीमार तर कुठं रॅली; या ठिकाणची होळी अजब अन् सगळ्यात भारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Celebration

Holi Celebration : कुठं लाठीमार तर कुठं रॅली; या ठिकाणची होळी अजब अन् सगळ्यात भारी!

उत्तर प्रदेशातील वृंदावनची होळी जगभरात लोकप्रिय आहे. येथील लाठमार होळी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. भगवान कृष्णाच्या जन्मस्थानी साजरी होणाऱ्या या होळीची स्वतःची पारंपरिक पद्धत आहे. रूढी आणि लोककथांनी बनलेली ही होळी येथील स्थानिक लोक आयोजित करतात.

होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीला आपल्या महाराष्ट्रात रंग खेळले जातात. पण, भारतभर होळीच्या दुसऱ्या दिवशीच संपूर्ण देश रंगात न्हाऊन निघतो. पण, केवळ रंग आणि मजा एवढेच याचे आकर्षण नाही तर अनेक राज्यात विशेष पद्धतीने साजरी केली जाते. गोवा, आसाम, राजस्थानमधील होळी प्रसिद्ध आहे. त्याबद्दलच जाणून घेऊया

गोकुळ, वृंदावन, बरसाना, नंदगाव आणि मथुरा येथील लोक ब्रजमधील होळीत सहभागी होतात. या दिवशी स्त्रिया पुरुषांसोबत होळी खेळण्यासाठी काठ्या आणि छडी वापरतात. कारण त्या आपल्या पतीला त्या दिवशी काठीचा प्रसाद देतात. तर पुरुष पत्नीचा मार पलटवण्यासाठी ढालीचा वापर करतात.

लाठीमार होली

लाठीमार होली

होळीबद्दल बोलताना वृंदावनचा उल्लेख टाळणे केवळ अशक्य आहे. फुलांनी सजलेलं वृंदावन पाहण्यासाठी लोक येथे उत्साहाने सहभागी होतात. या होळीची खासियत अशी असते की इथे फुलांसोबत होळी खेळली जाते. वृंदावनातील कृष्ण मंदिरातच या होळीचे आयोजन केले जाते.

वृंदावन

वृंदावन

होळी वेळी साजरा केला जाणारा दोल जत्रा ही केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर ओडिशा आणि आसाममध्येही साजरा केला जातो. पारंपारिक संगीत आणि नृत्य हा या उत्सवाचा आकर्षक भाग आहे. पौर्णिमेच्या दिवशी पुरुष आणि स्त्रिया पिवळे कपडे परिधान करतात. स्त्रिया केसांची खास रचना करतात.

आसाम

आसाम

उदयपूरची शाही होळी म्हणजेच 'धुलंडी' हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या दिवशी राजघराण्यातील वंशज होळीचा सण साजरा करण्यासाठी राजवाड्यात जमतात. शहरातील रस्त्यांवर आणि वाड्यांमध्ये रंग, पाणी, फुले, गुलालाची उधळण करून होळी साजरी केली जाते.

जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये राजघराण्याकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होलिका दहन कार्यक्रमही आयोजित केला जातो. होळीच्या वेळी राजस्थानची धुलंडी खेळण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी जमते आणि लोक शाही होळीचा आनंद लुटतात.

उदयपूर

उदयपूर

गोव्यात होळीला शिग्मोत्सोव म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने लोक रंग खेळतात आणि नव्या ऋतूचे स्वागत करतात. संस्कृती, रंग आणि खाद्यपदार्थांचा हा सण राज्यभर परेडच्या माध्यमातून साजरा केला जातो. परेडमध्ये पारंपारिक लोकनृत्य आणि पौराणिक देखावे चित्रित केले जातात.

गोव्यातील शिमगा

गोव्यातील शिमगा