
थोडक्यात
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही प्रोसेस तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
तुम्हाला पुर्ण रेल्वे कोच बुक करायचा असेल तर काय करावे लागेल.
यासाठी किती शुल्क भरावे लागेल हे आज जाणून घेऊया.
भारतात कन्फर्म ट्रेन तिकिटे मिळवणे खुप अवघड असू शकते. जेव्हा तुम्ही मोठ्या ग्रुपसह प्रवास करत असाल तेव्हा तर लवकर तिकीट मिळत नाही. एकत्र सीट बुक करणे कठीण वाटू शकते, परंतु इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ही सुविधा देते. तुम्ही संपूर्ण ट्रेन किंवा कोच बुक करू शकता. IRCTC च्या फुल टॅरिफ रेट (FTR) सेवेद्वारे संपूर्ण ट्रेन किंवा कोच कसे बुक करावे हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.