Foreign Travel Tips : बजेट-फ्रेंडली फॉरेन ट्रीप करायचीय? मग, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

Foreign Travel Tips : आयुष्यात एकदा तरी फॉरेन ट्रीप करावी, असे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते.
Foreign Travel Tips
Foreign Travel Tipsesakal

Foreign Travel Tips : आयुष्यात एकदा तरी फॉरेन ट्रीप करावी, असे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. जर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देखील परदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न पाहत असाल आणि बजेट कमी असल्यामुळे हा प्लॅन रद्द केला असेल तर असे करू नका.

कारण, आज आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन कसे करायचे? त्याबद्दल सांगणार आहोत. त्याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या आहेत या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Foreign Travel Tips
April Travel Places : कडक उन्हाळ्यात थंडावा हवाय? मग, ‘या’ ठिकाणी फिरायला जाण्याचा करा प्लॅन

फ्लाईटचे बुकिंग सर्वात आधी करा

जर तुम्हाला बजेटमध्ये फॉरेन ट्रिप प्लॅन करायची असेल तर, सर्वात आधी फ्लाईटचे बुकिंग करा. कारण, विमान प्रवासाच्या किंमती अचानक वाढतात. त्यामुळे, जर तुम्ही काही दिवस आधीच ट्रिपचे नियोजन केले असेल तर, फ्लाईट बुकिंग तेव्हाच करून घ्या. यामुळे, तुम्हाला तिकिटावर मोठी सूट मिळेल आणि बजेटमध्ये तुम्ही हे फ्लाईटचे तिकिट बुक करू शकाल. (book a flight)

हॉटेलचे बुकिंग आहे महत्वाचे

फॉरेनमध्ये गेल्यावर अनेकांना तिथल्या बऱ्याच गोष्टी माहित नसतात. त्यामुळे, विदेशात फिरायला जाण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने हॉटेलचे बुकिंग अवश्य करा. हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग केल्याने तुम्ही अनेक पैसे वाचवू शकता.

कारण, अनेक कंपन्या हॉटेलच्या ऑनलाईन बुकिंगवर काही प्रमाणात डिस्काऊंट आणि ऑफर्स देतात. ज्यामुळे, तुमच्या पैशांची बचत होऊ शकते. त्यासाठी, फ्लाईटचे बुकिंग केल्यानंतर तुमच्या हॉटेलचे बुकिंग करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही एकटेच परदेश दौऱ्यावर जाणार असाल तर, डॉरमेट्री रूमचे बुकिंग अवश्य करा. (Hotel Booking Important)

स्थानिक वाहतुकीने करा प्रवास

परदेशात गेल्यानंतर तुम्ही कॅब बुक करण्यापेक्षा तेथील स्थानिक वाहतुकीने ही प्रवास करू शकता. विशेष म्हणजे परदेशात स्थानिक वाहतूक अतिशय स्वस्त आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हजारो रूपयांची बचत नक्कीच करू शकता.

जर तुम्ही कॅबने प्रवास करायचे ठरवले तर तुमचे जास्त पैसे खर्च होऊ शकतात. त्याऐवजी जर तुम्ही स्थानिक वाहतुकीची मदत घेऊन प्रवास केला तर तुमचे पैसे वाचतील आणि बजेटमध्ये ट्रीप होण्यास मदत होईल. (Travel by local transport)

Foreign Travel Tips
Summer Travel Places : कडक उन्हाळ्यात कूल व्हायचंय? तर बॅग भरो निकल पडो, याहून बेस्ट ऑप्शन शोधूनही नाही सापडणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com