Delhi Tourism Initiative : ४ थी ते ६ वीच्या विद्यार्थ्यांना फिरता-फिरता मिळणार बक्षीसं ! जाणून घ्या दिल्ली पर्यटन विभागाचा 'हेरिटेज पासपोर्ट' उपक्रम

School Students Heritage Tour: पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी,१५ ऑगस्टनंतर ६ महिने चालणार मोहीम
School Students Heritage Tour

School Students Heritage Tour

sakal 

Updated on

शालेय विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता आपल्या शहराचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता यावा, यासाठी दिल्ली सरकारने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. इयत्ता चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'हेरिटेज पासपोर्ट' (Heritage Passport) नावाची एक विशेष पासपोर्ट पद्धतीची पुस्तिका सादर केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील २३ ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटन विभागाकडून आकर्षक पुरस्कार दिले जातील.दिल्ली पर्यटन आणि वाहतूक विकास महामंडळ (DTTDC) आणि शिक्षण विभाग एकत्रितपणे १५ ऑगस्टनंतर  हा कार्यक्रम सुरू  करणार असून, तो पुढील ६ महिने चालू राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com