International Museum Day 2021: भारतातील 'या' म्युझियम्समध्ये आहेत आश्चर्यचकित करणाऱ्या प्राचीन वस्तू

International Museum Day 2021: भारतातील 'या' म्युझियम्समध्ये आहेत आश्चर्यचकित करणाऱ्या प्राचीन वस्तू

गेल्या तब्बल ५४ वर्षांपासून म्हणजेच १९७७ पासून जगभरात जागतिक संग्रहालय दिन (International Museum Day 2021) साजरा केला जातो. जगातील सर्व सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा ज्या वास्तूमध्ये जपून ठेवण्यात आला आहे अशा वास्तूंना महत्व मिळवून देणारा हा दिवस. जगातील लोकांमध्ये एकी राहावी, सांस्कृतिक वारसा अढळ राहावा, प्राचीन संस्कृतीचं महत्व आताच्या पिढीपर्यंत दृढतेनं प्रगट व्हावं आणि शांतता कायम राहावी यासाठी संग्रहालयं उभारण्यात येतात. संग्रहालयांचे भविष्य: पुनर्प्राप्त आणि पुनर्प्राप्ती (The Future of Museums: Recover and Reimagine) ही २०२१ च्या जागतिक संग्रहालय दिनाची थीम आहे. दरवर्षी जगभरातील हजारो संग्रहालयं या जागतिक संग्रहालय दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतात. मात्र आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही संग्रहालयांबद्दल (Top Museum in India) सांगणार आहोत, ज्यांना भेट देऊन तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. (International Museum Day 2021 these are top museums in India)

द इंडियन म्युझियम, कोलकता (The Indian Museum, Kolkata)

सन १८१४ ला बंगालच्या आशियाटिक सोसायटीनं या संग्रहालयाची स्थापना केली. भारतातील सर्वात जुनं संग्रहालय म्हणून या संग्रहालयाची ओळख आहे. या संग्रहालयात प्राचीन काळच्या वस्तू, जीवाष्म, ममीज आणि मुघल काळातील काही सुंदर पेंटिंग्स जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयात कला, पुरातत्व, मानववंशशास्त्र, भूशास्त्र, प्राणीशास्त्र आणि आर्थिक वनस्पतिशास्त्र असे सहा विभाग आहेत. तब्बल ४००० वर्षांपूर्वीची इजिप्तीयन ममी आणि बुद्धांचे अवशेष असणारा कलश या संग्रहालयाचं वैशिट्य आहे.

संग्रहालयाचा पत्ता - हुमायूं पीएल, फायर ब्रिगेड हेड क्वार्टर, न्यू मार्केट एरिया, धर्मतला, तालटाला, कोलकाता, पश्चिम बंगाल 700016

द सलार जंग म्युझियम, हैदराबाद (The Salar Jung Museum, Hyderabad)

हे संग्रहालय शिल्पे, चित्रे, कोरीव काम, वस्त्रे, हस्तलिखिते, कुंभारकामविषयक वस्तू, धातूच्या वस्तू, कार्पेट्स, घड्याळे आणि फर्निचर यांसाठी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू भारतासह जपान, चीन, बर्मा, नेपाळ, पर्शिया, इजिप्त, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांतून आणून जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. हे संग्रहालयं जगातील काही मोठ्या संग्रहालयांपैकी एक आहे.

संग्रहालयाचा पत्ता - सालार जंग आरडी, मीनार फंक्शन हॉल जवळ, दारुलशिफा, हैदराबाद, तेलंगाना 500002

द नॅशनल म्युझियम, दिल्ली (The National Museum, Delhi)

हे भारतीय उपखंडातील सर्वोत्कृष्ट संग्रहालयांपैकी एक आहे, राष्ट्रीय संग्रहालयात सुमारे पाच हजार वर्षांच्या सुमारे १ लाख पन्नास हजार वस्तू आहेत. या संग्रहालयात भगवान शिव यांच्या तांडव नृत्याचा पुतळा, सिंधू संस्कृतीतील कलाकृती, पिपराहवातील बुद्धांचे अवशेष आणि लघु चित्रांचे उत्तम संग्रह आहेत.

संग्रहालयाचा पत्ता - जनपथ आरडी, राजपथ क्षेत्र, केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली, दिल्ली

Picasa

सबमरीन म्युझियम, विशाखापट्टणम (Submarine Museum, Vishakhapatnam)

भारतीय नौदलाच्या जवानांच्या महान कार्यावर आधारित असलेलं भारतातील हे संग्रहालय खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. या संग्रहालयात भारताची 5 वी पाणबुडी होती, ती रशियाकडून खरेदी केली गेली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये या पाणबुडीचा समावेश होता.

संग्रहालयाचा पत्ता - आरके बीच आरडी, किर्लंपुडी लेआउट, चिन्ना वॉल्टैर, पांडुरंगपुरम, विशाखापट्टनम, आंध्र प्रदेश

(International Museum Day 2021 these are top museums in India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com