Women's Day 2024 : भारतातील 'हे' शहर महिलांसाठी आहे सर्वात सुरक्षित; फिरायला गेल्यानंतर 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

Women's Day 2024 : जगभरात दरवर्षी ८ मार्चला 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता अवघ्या काही दिवसांवर हा महिला दिन येऊन ठेपला आहे.
Women's Day 2024
Women's Day 2024 esakal

Women's Day 2024 : जगभरात दरवर्षी ८ मार्चला 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर हा महिला दिन येऊन ठेपला आहे. या महिला दिनानिमित्त अनेक महिला एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात.

काही महिला फिरायला जातात तर काही महिला वेगवेगळे प्लॅन्स बनवतात. जर यंदा तुम्ही देखील महिला दिनानिमित्त फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर भारतातील कोलकाता या शहराची निवड करायला काहीच हरकत नाही.

कारण, महिलांसाठी सर्वात सुरक्षित असलेल्या शहरांच्या यादीमध्ये भारतातील कोलकाता हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने गेल्या वर्षी एक अहवाल जारी केला होता. त्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे महिलांसाठी सर्वात सुरक्षित असलेल्या शहरांच्या यादीत कोलकाता या शहराचा सलग तिसऱ्यांदा क्रमांक लागला आहे. त्यामुळे, फिरण्यासाठी हे शहर उत्तम आहे. महिला दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला कोलकाता शहरातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊ शकतात. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Women's Day 2024
Women's Day 2024 : दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणे स्वर्गाहून सुंदर आहेत, महिलांनो सोलो ट्रॅव्हलिंगचा करा प्लॅन

प्रिंसेप घाट

पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी म्हणजे कोलकाता हे शहर होय. या शहरातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेले ठिकाण म्हणजे प्रिंसेप घाट. कोलकात्यामध्ये आल्यावर या ठिकाणाला अवश्य भेट द्या.

या घाटावर मनसोक्तपणे तुम्ही बोटिंग करू शकता. त्यासोबत घाटावर तुम्हाला विविध प्रकारचे फूड स्टॉल्स देखील दिसतील. या फूड स्टॉल्सवर तुम्ही कोलकाता शहरातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेऊ शकता. कोलकाता या शहरातील सर्वात शांत ठिकाणांपैकी एक असलेले हे ठिकाण आहे. कोलकाता शहरात निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. (princep ghat )

हावडा ब्रिज

कोलकाता या शहराची खास ओळख असलेल्या हावडा ब्रिजला अनेक पर्यटक भेट देतात. या शहरातील हे प्रमुख प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे या पुलाला सकाळी आणि रात्री भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. या पुलावरून दिसणारे दृश्य हे विलोभनीय असते.

सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी आणि सायंकाळचे दृष्य पाहण्यासाठी तुम्ही या पुलाला भेट देऊ शकता. या पुलाची एकूण लांबी ७०५ मीटर असून त्याची रूंदी ३० मीटर आहे. कोलकाता या शहरात आल्यानंतर हावडा ब्रिजवर जाण्यासाठी तुम्ही कोलकात्यात कुठूनही बस, टॅक्सी किंवा कारची मदत घेऊ शकता. (Howrah Bridge)

Women's Day 2024
Travel Diaries : मार्चमध्ये लाँग ट्रीपवर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'या' भन्नाट ठिकाणांना नक्की द्या भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com