
रांची : झारखंडमध्ये खाण पर्यटन सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने पुढाकार घेतला असून यासाठी कोल इंडियाच्या सीसीएलशी करार केला आहे. अलिकडेच मुख्यमंत्री सोरेन यांनी बार्सिलोना येथील गावा संग्रहालयाला भेट दिली आणि तेथे प्राचीन खाण उत्खननाचे तंत्रज्ञान आणि निओ लिथिक काळातील उत्खननाची पद्धतीचे (सुमारे इसपूर्व ४३०० वर्ष) अवलोकन केले.