Kaziranga National Park : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचा विचार करताय? मग, ‘या’ महत्वाच्या गोष्टी घ्या जाणून

Kaziranga National Park : भारतातील आसाम राज्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान होय.
Kaziranga National Park
Kaziranga National Park esakal

Kaziranga National Park : भारतातील आसाम राज्य हे तेथील नयनरम्य परिसरासाठी सुप्रसिद्ध आहे. या राज्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (Kaziranga National Park) होय. येथील वन्यजीव प्राण्यांसाठी हे राष्ट्रीय उद्यान जगभरात प्रसिद्ध आहे. १९८५ मध्ये युनेस्कोने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे.

या राष्ट्रीय उद्यानात दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देत असतात. या उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील एक शिंगी असलेला गेंडा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. आसाममधील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणून हे प्रामुख्याने ओळखले जाते. हे उद्यान जवळपास ४३० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे.

जर तुम्ही या राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला काझीरंगा उद्यानाशी संबंधित असलेल्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्यामुळे, हा लेख शेवटपर्यंत वाचा. (Kaziranga National Park)

काझीरंगा उद्यानाला जायचे कसे ?

आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ गुवाहाटी, जोरहाट आणि दिब्रुगड ही प्रमुख विमानतळ आहेत. तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर या तिन्हीपैकी एका विमानतळावर तुम्ही उतरू शकता. जोरहाट या विमानतळापासून हे उद्यान अगदी ३७ किलोमीटर अंतरावर आहे तर गुवाहाटी ते काझीरंगा हे अंतर अंदाजे २०० किलोमीटर आहे. दिब्रुगडबद्दल बोलायचे झाल्यास हे विमानतळ काझीरंगापासून २५१ किलोमीटरच्या अंतरावर आहे.

रेल्वेने जर तुम्ही येणार असाल तर काझीरंगापासून जवळचे रेल्वे स्टेशन हे गुवाहाटी आहे. रेल्वेप्रवास किंवा विमानप्रवास यातील तुमच्या सोयीनुसार तुम्ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ शकता. (How to go to Kaziranga Park?)

काझीरंगा उद्यानाची स्थापना कधी झाली होती ?

१९०५ मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही आरक्षित जंगल म्हणून करण्यात आली होती. त्यानतंर, १९७४ मध्ये या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.

विशेष म्हणजे १९८५ मध्ये या उद्यानाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला. २००७ मध्ये या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आले.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला बिग फाईव्ह असे ही संबोधले जाते. या उद्यानात तुम्हाला बंगाल वाघ, एक शिंगे असलेला गेंडा, वाइल्डबीस्ट आणि जंगली म्हैस देखील पहायला मिळतील. त्यामुळेच, या उद्यानाला बिग फाईव्ह असे म्हटले जाते. (When was Kaziranga Park established?)

काझीरंगा उद्यानातील खास वैशिष्ट्ये कोणती ?

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पक्ष्यांच्या तब्बल ४७८ प्रजाती पहायला मिळतील. यापैकी २५ प्रजाती या जागतिक स्तरावर नामशेष झाल्या आहेत. परंतु, केवळ या उद्यानात तुम्हाला त्या पहायला मिळतील. यासोबतच २१ प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. बंगाल फ्लोरिकनचे शेवटचे घर म्हणजे हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान होय.

काझीरंगा उद्यानात गेल्यावर तुम्ही हत्ती सफारीचा ही आनंद घेऊ शकता. हे उद्यान साधारणपणे ४ झोनमध्ये विभागले गेले आहेत. येथील वन्यजीव आणि सुंदर पक्षी पाहिल्यानंतर तुमची ट्रीप ही अविस्मरणीय ठरेल यात काही शंका नाही. (special features of Kaziranga Park)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com