खाऱ्या हवेतील निसर्गसौंदर्य - खारेपाटण

कोकणातील मनमोहक निसर्ग व प्रभावशाली इतिहास यांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी या स्थळाला भेट देणे क्रमप्राप्त ठरते.
sea shore
sea shoregoogle

निसर्गाने महाराष्ट्राला भरभरून दिलेले आहे. या नैसर्गिक सौंदर्यात भर घातली आहे ती इथल्या इतिहासाने. या इतिहासाच्या पाऊलखुणा आज आपण जागोजागी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या रुपात अनुभवू शकतो. महाराष्ट्राचे हेच आगळे-वेगळे रूप पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. असेच भुरळ घालणारे एक स्थळ म्हणजे कोकणात झाडांच्या दाटी-वाटीत विसावलेले खारेपाटण हे गाव. आज हे गाव जगासाठी अज्ञात असले तरी एके काळी या गावाची कीर्ती कोकण किनाऱ्याहून चालणाऱ्या व्यापारामार्फत साता समुद्रापलीकडे पोहोचली होती. म्हणूनच कोकणातील मनमोहक निसर्ग व प्रभावशाली इतिहास यांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी या स्थळाला भेट देणे क्रमप्राप्त ठरते.

कोकणातील मुख्य आकर्षण म्हणजे इथला समुद्र व त्याच्या सोबतीने बहारास आलेले इथले सृष्टी सौंदर्य. खारेपाटण गावही याच सौंदर्याचा वारसा जपत वाघोटन खाडीच्या किनाऱ्यावर आपल्या झोळीत भूतकाळातील अनेक दुवे सांभाळत दिमाखात उभे आहे. वास्तविक वाघोटन खाडी म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा. ही सीमा ओलांडल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील प्रथम जे गाव लागते ते म्हणजे खारेपाटण. 

sea shore
नागपूर : पेंच प्रकल्पात आता कृषी-वन पर्यटन

कसं जायचं ?

हे गाव कोकण रेल्वेच्या राजापूर (रत्नागिरी जिल्हा) व नांदगाव (सिंधुदुर्ग जिल्हा) या स्थानकांपासून अनुक्रमे १८ व ३२ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच चिपी विमानतळापासून ८६ किलोमीटरवर आहे. खारेपाटण हे गाव मुंबई-गोवा महामार्गावर असून रत्नागिरीतील शेवटचे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले गाव असल्याने या गावी एसटी, खासगी बस तसेच खासगी वाहनांच्या माध्यमातून पोहोचता येते. मुंबई-पुण्यातून रस्तेमार्गे या गावी पोहोचण्यास साधारण १० ते ११ तास लागतात.

कोकण रेल्वेने राजापूर किंवा नांदगाव या स्थानकांवर उतरून स्थानिक वाहतूक साधनांच्या माध्यमातून ३० ते ४० मिनिटांत खारेपाटण या गावी पोहोचता येते. विमानाने या स्थळास भेट देऊ इच्छिणारे चिपी (वेंगुर्ला तालुका) विमानतळावर उतरून स्थानिक वाहतूक साधनांच्या मदतीने दीड ते पाऊण तासात पोहोचू शकतात. रत्नागिरीच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विमानतळापासून या गावी पोहोचण्यास साधारण सव्वा-दोन तास लागतात.

अंतर्गत प्रवासासाठी भाड्याने वाहन उपलब्ध होते.

sea shore
गुहागर : पर्यटन अनुभवले; समस्यांनाही जाणले

राहाणं-खाणं

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत. एका दिवसाचे भाडे साधारण १ हजार ५०० रूपये आहे. अन्य खासगी रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी २ ते ३ हजार रुपये खर्च येतो. होम स्टेमध्ये राहण्यासाठी ७०० ते १००० रुपये खर्च येतो. हंगामानुसार भाड्यात बदल होतो. मांसाहारी तसेच शाकाहारी अशा सर्व पद्धतीच्या अस्सल मालवणी व कोकणी जेवणाच्या मुबलक सोयी उपलब्ध आहेत.

लेखन - शमिका सरवणकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com