esakal | भारतातील सुप्रसिद्ध तलावांपैकी एक 'चंद्रताल'
sakal

बोलून बातमी शोधा

भारतातील सुप्रसिद्ध तलावांपैकी एक 'चंद्रताल'

चंद्रतालचा शब्दशः अर्थ आहे चंद्राचा तलाव म्हणजेच चंद्राच्या आकाराचा तलाव.

भारतातील सुप्रसिद्ध तलावांपैकी एक 'चंद्रताल'

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

निशिगंधा क्षीरसागर

आज आम्ही तुम्हाला एका अशा प्रसिद्ध ठिकाणाविषयी सांगणार आहोत. ज्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेकर्स (Trekkers) आणि पर्यटक (Tourists) कायम उत्सुक असतात. भारतातील सर्वात नयनरम्य ठिकाणे जी बघून डोळ्यांचे पारणे फिटते अशी ठिकाणे हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये स्थित आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. उंच उंच पर्वतशिखरे, दाट जंगले, खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि झरे आणि यासोबतच असणारी बोचरी थंडी हे हिमालयातील ठिकाणांचे वैशिष्ट्य आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाची माहिती सांगणार आहोत. हे ठिकाण म्हणजेच चंद्रताल तलाव (chandratal lake). चंद्रतालचा शब्दशः अर्थ आहे चंद्राचा तलाव म्हणजेच चंद्राच्या आकाराचा तलाव. हिमालयात जवळजवळ ४० हजार मीटर पेक्षाही अधिक उंचीवर असलेले चंद्रताल हे ठिकाण हिमालयातील प्रसिद्ध स्पिती आणि कुल्लू व्हॅली पासून अगदी थोड्याच अंतरावर स्थित आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशातील तसेच विदेशी पर्यटक (Foreign tourists) या ठिकाणाला भेट देतात. चला जाणून घेऊया चंद्रताल तलाव या विषयीच्या काही खास गोष्टी. (know-about-spiti-valley-and-chandratal-lake)

सिल्क रूट या नावाने ओळख

प्राचीन काळात भारताचा अफगाणिस्तान, तिबेट, चीन तसेच काही अरब देशांशी व्यापार चालायचा, तेव्हा खूप रस्ते या चंद्रतालच्या आसपासच्या परिसरातून जात होते. त्यामुळे या परिसराला 'सिल्क रूट' (Silk Route) या नावाने प्रसिद्धी होती. पण मध्ययुगीन काळात हे रस्ते बंद झाले आणि त्यानंतर या चंद्रातालची पर्यटन स्थळांमध्ये गणना केली जाऊ लागली.

पौराणिक इतिहास

चंद्रताल ला अटल रोहतांग टनेल ने देखील जाता येते. या चंद्रताल विषयी स्थानिक लोकांमध्ये अनेक पौराणिक दंतकथा प्रसिद्ध आहेत. महाभारत काळात या तलावाच्या काठावरती जेष्ठ पांडव युधिष्ठिराने भगवान इंद्रांचा रथ उचलला होता आणि त्यानंतर कित्येक वर्ष येथे तलावाची पूजा करण्यात यायची. चंद्रताल तलाव देशातील पवित्र तलावांपैकी एक आहे. या तलावातील पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ असते. तसेच तलावातील पाण्याचा रंग बदलताना दिसतो. खूप वेळा जोरदार हिमवर्षाव झाल्यानंतर हे ठिकाण पर्यटनासाठी बंद करण्यात येते.

इतर पर्यटन स्थळे

या परिसरात फक्त चंद्रतालच नाही तर इतरही नयनरम्य ठिकाणे आहेत. काई मठ, कुंजूम पास, धनकर तलाव आणि धनकर मठ ही पर्यटन स्थळेही प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रताल हे ठिकाण ट्रेकिंगसाठी सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे, सुचिपर्णी वृक्ष, झुळझुळणाऱ्या नितळ, स्वच्छ पाण्याच्या नद्या, तलाव आणि झरे ही सुंदर दृष्ये नजरेत भरतात आणि अशा वातावरणात ट्रेकिंग करायला मिळणे म्हणजे ट्रेकर्ससाठी एक पर्वणीच आहे. म्हणूनच चंद्रताल प्रसिध्द ठिकाणांमध्ये गणले जाते.

तुम्ही कधी जाणार?

चंद्रताल तलावाला भेट देण्यासाठी जुलै ते ऑगस्ट हा कालावधी योग्य मानला जातो. कारण या महिन्यामध्ये तापमान योग्य असते, तसेच हिमवर्षाव कमी होऊन वातावरण स्वच्छ असते. जसेजसे तापमान कमी होते तसतशी थंडी वाढत जाते आणि रस्ते बर्फाने झाकले जातात. त्यामुळे जुलै ते ऑगस्ट या दरम्यानच या ठिकाणी पर्यटनासाठी यावे.

(know-about-spiti-valley-and-chandratal-lake)