पावसाळ्यामध्ये Adventure Trip करायचीये, मग ही आहेत महाराष्ट्रातील १० बेस्ट ठिकाणं

monsoon trip ideas: पावसाळ्यातील Monsoon विकेण्डसाठी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत फिरायला Tourism जाण्याचे प्लॅन्स नक्की आखत असाल. यासाठी आम्ही तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी महाराष्ट्रातील काही खास ठिकाणं सांगणार आहोत
monsoon trip ideas
monsoon trip ideasEsakal

Adventure Trip: पावसाळा सुरू झाला की पूर्ण निसर्ग ताजातवाना दिसू लागतो. हिरव्या गार डोंगर दऱ्यांमधून झरे आणि धबधबे वाहू लागतात. नद्या खळखळून वाहू लागतात तर जलप्रवाह तुडुंब भरतात. Know the famous spots in Maharashtra for Monsoon Adventure Tourism

पावसाच्या सरींनी Monsoon Showers भिजलेले हिरवेगार डोंगर पाहून मनाला शांत वाटू लागतं. पावसाळा आला की मग पावसाळी सहलींचे देखील प्लॅन्स रंगू लागतात. पावसाळ्यामध्ये लाँग ड्राइव्हला जाणं, बाईक राईड तसचं ट्रेकिंग, हायकिंगला जाणं अशा गोष्टी करणं अनेकजण पसंत करतात.

पावसाळ्यातील Monsoon विकेण्डसाठी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत फिरायला Tourism जाण्याचे प्लॅन्स नक्की आखत असाल. यासाठी आम्ही तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी महाराष्ट्रातील काही खास ठिकाणं सांगणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथलं पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. यातील काही ठिकाणं अशी आहेत जिथं तुम्ही एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

माळशेज घाट- सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील माळशेज घाट पावसाळ्यामध्ये अधिक खुलून दिसतो. इथले हिरवेगार डोंगळ आणि त्यातून खळखळत वाहणारे धबधबे मन मोहून टाकतात. खास करून जर तुम्ही लाँग ड्राइव्हचा प्लॅन करत असाल तर माळशेज घाटासारखं निसर्गरम्य ठिकाणाला भेट देणं उत्तम पर्याय आहे.

खास करून युरोपमधून प्रवास करून आलेले हजारो फ्लेमिंगो पावसाळाच्या काळात माळशेज घाटात विसावतात. इथं तुम्ही हरिश्चंद्र गडावर ट्रेकला जाऊ शकता. तसचं आजोबा हिल फोर्टवर हायकिंग करू शकता. तसचं धबधब्यांवर भिजण्याची मजा लूटू शकता.

हे देखिल वाचा-

monsoon trip ideas
Monsoon Car Tips : आला पावसाळा, गाड्या सांभाळा! अपघात टाळण्यासाठी तपासून घ्या टायर; पाहा कसं

लोणावळा आणि खंडाळा- मुंबईकर आणि पुणेकरांसाठी पावसाळ्यातील बेस्ट डेस्टिशन म्हणजे लोणावळा आणि खंडाळा. गर्द झाडं-झुडपं. डोंगऱ माथ्या वरून वाहणारे असंख्या लहान मोठे धबधबे, ढगांच्या आड जाणारे डोंगर अशी सुंदर निसर्गाची अनुभुती घेण्यासाठी लोणावळा आणि खंडाळा ही ठिकाणं उत्तम आहेत.

इथं तुम्ही भुशी डॅमवर कुटुंबियांसोबत एन्जॉय करू शकता. तसचं वॅक्स म्युझियम, एकविरा देवीचं मंदीर, राजमाची किल्ला, पवना लेक अशी अनेक भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत.

ठोसेघर धबधबा- सातारा जिल्ह्यातील ठोसेघर हे ठिकाण पावसाळी सहलीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. डोंगऱमाथ्यावरून कोसळणारे असंख्य धबधबे Waterfalls तुम्हाला इथं पाहायला मिळतील. अगदी लहान झऱ्यांपासून ते ५०० मीटर उंचीवरून धबधबेदेखील आपलं लक्ष वेधून घेतात. इथं तुम्ही इथल्या धबधब्यांवर मनसोक्त भिजण्याची मजा लूटू शकता.

त्याचप्रमाणे जर तुम्ही ठोसेघर धबधब्यांचं पिकनिक प्लॅन करत असाल तर तुम्ही याच वेळी कास लेक, प्रतापगड, सज्जनगड आणि कोयना डॅम या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता. पावसाळ्यामधील इथला निसर्ग तुम्हाला रिफ्रेश करेल.

हे देखिल वाचा-

monsoon trip ideas
Monsoon In India : इथे घेता येईल मान्सूनचा दुप्पट आनंद , तेव्हा लगेच भेट द्या भारतातील या 6 ठिकाणांना

माथेरान- रोजच्या कामातून जर तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी निसर्गाच्या कुशीत पावसाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही माथेरानची पिकनीक प्लॅन करू शकता. माथेरानमध्ये गाड्यांना परवानगी नसल्याने तुम्ही इथं पायी वेगवेगळ्या पॉइंट्सला भेट देऊ शकता. तसचं घोड्यावरूनही तुम्ही माथेरानच्या झुडपांमध्ये फेरफटका मारू शकता.

पावसाळ्यामध्ये इथला निसर्ग पर्यटकांना अधिक आकर्षित करतो. दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्ग अधिक खुलतो. माथेरानमध्ये तुम्ही घोडस्वारीसोबत, पॅरासिलिंग आणि शॉपिंग तसचं धबधब्यांवर भिजण्याची मजा लूटू शकता.

तापोळा- साताऱ्या जिल्ह्यातील तापोळा हे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. पावसाळी सहलीसाठी तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये तापोळ्याचा नक्की समावेश करू शकता. महाबळेश्वरपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेलं तापोळा हे गाव निसर्गरम्य ठिकाण आहे. इथलं अद्भूत सौंदर्य तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल.

तापोळ्याला जात असताना तुम्ही वेण्णा लेकमध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसचं पॅराग्लायडिंग करू शकता, शिवसागर लेकला फेरफटका मारू शकता आणि अर्थात महाबळेश्वरच्या निसर्गसौदर्याची अनुभुती घेऊ शकता.

कर्नाळा- मुंबईकरांसाठी विकेण्ड मॉन्सून पिकनीकसाठी कर्नाळा हा एक चांगला पर्याय आहे. पावसाळ्यामध्ये इथल्या हिरवळीतून वाहणारे धबधबे आकर्षण ठरतात. तसचं स्थलांतरित होवून आलेल्या अनेक पक्षांच्या विविध प्रजाती इथं पाहायला मिळतात.

धबधब्यांवर भिजण्याचा मनमुराद आनंज लुटण्यासोबतच तुम्ही कर्नाळा किल्ल्याला भेट देऊ शकता.

हे देखिल वाचा-

monsoon trip ideas
Monsoon Tea: पावसाळ्यात चहाची तल्लफही भागेल आणि आरोग्यही सुधारेल; या गोष्टी ट्राय करा!

मुळशी डॅम- तर पुणेकरांसाठी मुळशी डॅम हे एक बेस्ट विकेण्ड डेस्टिनेशन आहे. हिरव्यागार डोंगरांवर सुरु असलेला ढगांचा लंपडाव पाहण्यासारखा असतो. तसचं इथला जलसागर आणि हिरवळ मन मोहून टाकणारी असते.

मुळशी डॅमला तुम्ही वॉटर स्पोर्टस् आणि पॅरा ग्लायडिंगची मजा लूट शकता. तसचं इथे असलेल्या रिसॉर्टमध्ये थांबून तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

अशा प्रकारे या पावसाळ्यामध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी भेटू देवून तुमच्या कुटुंबियांसोबत तसचं मित्र-मैत्रिणींसोबत पावसाची आणि निसर्गाची मजा लूटू शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com