esakal | मोठमोठे जहाज आपल्याकडे खेचून घेणारे एक मंदिर! जाणून घ्या रहस्य

बोलून बातमी शोधा

konark temple
मोठमोठे जहाज आपल्याकडे खेचून घेणारे एक मंदिर! जाणून घ्या रहस्य
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारत देश अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेला आहे. अशा अनेक रहस्यमयी जागा आहेत जिथले कोडे मानवाला अद्यापही सुटलेले नाही. अशीच एक जागा आहे जिथे समुद्रामध्ये मध्यभागी जाणारे जहाज पुन्हा समुद्र किनाऱ्याकडे ओढले जाते. आज आपण अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक पुरातन काळातील मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. जे ओरिसा राज्यातील पूरी या ठिकाणी वसलेले आहे.

जिथे भगवान श्री कृष्ण, बलराम,आणि सुभद्रा यांच्या पावण मंदीरा पासून थोड्याच किलोमीटर अंतरावर भगवान सूर्याचे कोणार्क मंदिर स्थित आहे. हे मंदिर समुद्रापासून काहीच अंतरावर आहे. ही मंदिराची कलात्मकता पाहून सगळे लोक मंत्रमुग्ध होतात. या मंदिराची पौराणिक घडण बघून हे भव्य मंदिर त्या काळी साधनांचा आभाव असतानाही कसे बांधले गेले असल्याने या बाबत भक्तांमद्ये कमालीची उत्सुकता आहे. अशा अनेक पौराणिक आणि रहस्यमय गोष्टी या मंदीराबद्दल दडलेले आहे .

१८६४ मंध्ये युनेस्को ने या कोडाच्या मंदिराला विश्व धरोहर चा दर्जा दिला. हे मंदिर ओरिसा राज्यातील पुरी या ठिकाणी आहे. तिथूनच ४० किलोमीटर दूरच कोणार्क सूर्य मंदिर स्थित आहे . चंद्र भागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे सूर्य मंदिर रहस्यमय आणि ऐतिहासिक आहे. या ठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येतात. हे एक पर्यटणाचे केंद्र बनलेले आहे. भारतातील अनेक धार्मिक मंदिरं लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

या ठिकाणाला कोणार्क हे नाव कसे पडले असावे? तर लोकांच्या माहितीनुसार हा शब्द दोन शब्दानी बनलेला आहे. एक कोना म्हणजे किनारा आणि अर्क म्हणजे सूर्य या शब्द एकत्रितरित्या या मंदिराला कोणार्क हे नाव दिले गेले असावे. पुराणातील कथेच्या इतिहासावरून अशी माहिती मिळते की हे मंदिर १३ व्या शतकात बांधलेले गेले असावे.या मंदिराची कलात्मकता पाहून असे वाटते की हे मंदिर खूपच विचार करून आणि आपल्या निपुणतेने बांधले गेले असावे. पुराणातील कथेवरून या मंदिराचे निर्माण गंग वंशचा राजा नरसिंहदेव याने आपल्या काळात १२४३ ते १२५५ मध्ये केले असावे. हे मंदिर बांधण्यासाठी १२०० कारागीर लागले होते. असे सांगितले जाते

त्या काळातील लोकं त्या काळात सूर्य देवाची आराधना करत होते. यामुळे हे कोणार्क सूर्य मंदिर बांधले गेले असावे अशी मान्यता आहे. कलिंग शैलीमध्ये हे मंदिर बांधले गेल्याने खुद्द भगवान सुर्यदेव स्वतः धर्तीवर अवतरले आहेत.असा भास भक्तांना होतो. सुर्यदेव साक्षात रथात विराजमान झालेले असून ते स्वर्गातून अवतरले आणि पृथ्वीवर प्रगटले असे वाटते.या मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे. जसे की सूर्यदेव आपल्या रथात विराजमान होऊन पुडे जात आहेत