
महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला आहे. या निवडणुकीत अविश्वसनीय असा कल मतदारांनी महायुतीच्या पारड्यात घातला आहे. राज्यात काही महिन्यांआधी राबवलेल्या योजना महायुतीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र या निकालातून स्पष्ट झाले आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून कामात असलेले उमेदवार कालच्या निकालानंतर थोडे रिलॅक्स झाले असतील. लवकरच महाराष्ट्रात शपथविधी होईल आणि नवे सरकार स्थापन होईल. यानंतर खरे आमदार थोडे विश्रांती घेतील. (Best Tourist Places For New MLA's)