

History Lovers Maharashtra
esakal
Asherigad Trek Tips: पालघर जिल्हा निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांनी समुद्ध आहे. यातील अशेरीगड किल्ला हा फक्त इतिहास प्रेमींना आकर्षित करणारा नाही, तर ट्रेकिंगसाठीही खूप लोकप्रिय आहे. सुमारे ८०० वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला शिळहार राजवंशांच्या काळात बांधला गेला होता आणि आजही त्याची भव्य तटबंदी, बुरुज आणि अवशेष पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.