esakal | कोलकातामधील झपाटलेल्या ठिकाणांची आहे रहस्यमय, रंजक कथा

बोलून बातमी शोधा

कोलकातामधील झपाटलेल्या ठिकाणांची आहे रहस्यमय, रंजक कथा
कोलकातामधील झपाटलेल्या ठिकाणांची आहे रहस्यमय, रंजक कथा
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः पश्चिम बंगाल राज्यात कोलकाता शहरासह अनेक सुंदर ठिकाणे पर्यटकांनी संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. त्यात दार्जिलिंग, हावडा ब्रिज, समुद्र किनारे आदी ठिकाणांना भेट देण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु, कोलकातामध्ये अशा सुंदर ठिकाणांच्या वैतरिक्त असे काही ठिकाणे आहे जिथे दिवसा देखील जाण्याला लोक घाबरतात. चला जाणून घेवू या ठिकाणांबद्दल..

पुतुलबाडी

पुतुलबाडी हे कोलकाता मधील सर्वात भयंकर ठिकाण आहे. पुतुलबाडी हे हेरिटेज हाऊस असून या घराच्या वरच्या मजल्यावर अनेक प्राचीन बाहुल्या ठेवल्या आहेत, जिथे कोणालाही जाण्यास भीती वाटते. घराविषयीची कहाणी अशी आहे की या घरात, जमीनदारांनी स्त्रियांवर अत्याचार केले आणि नंतर त्यांची हत्या देखील केली. या घटनेनंतर इथल्या कोणालाही जाण्याची भीती वाटते. येथे महिला हसतांना आणि घुंगरुचा आवाज एकू येतात असे स्थानीक सांगतात..

रवींद्र सरोबार

कोलकाता मधील आणखी एक डेंजर ठिकाण आहे. रवींद्र सरोबार हे एक मेट्रो स्टेशन आहे. हे स्थळ देखील अनेक भूत कथांसाठी प्रसिद्ध आहेत. ही जागा घेताना अनेक आत्महत्या येथे झाल्या. येथून शेवटची मेट्रो ट्रेनमधुन जाणाऱ्यांवा अनेक वाईट अनूभव आहे.

लेखक ईमारत

ब्रिटीशांनी बांधलेली ही इमारत कोलकातामधील सर्वाधिक भयांनक जागांपैकी आहे. तीनशे वर्षांहून अधिक जुन्या या इमारतीच्या निर्जन आणि रिकाम्या खोल्यांमध्ये अनेक रहस्यमय गोष्टी आहे . या इमारतीबद्दल असे म्हणतात की आजही ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन सिम्पसनचा आत्मा येथे असल्याचे सांगीतले जातात. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीच्या वेळी या इमारतीत क्रांतिकारकांनी कॅप्टन सिम्पसनलाा मारले होते, तेव्हापासून या जागेला पछाडलेले असून संध्याकाळी पाच वाजल्यानंतर कोणी ही एकट जायला येथे घाबरतो.

साऊथ पार्क स्ट्रीट कब्रस्तान

कोलकाता तसेच संपूर्ण पश्चिम बंगालमधील भयानक ठिकाणांपैकी एक म्हणजे साउथ पार्क स्ट्रीट कब्रिस्तान (स्मशानभूमी). येथे बरेच लोक भेट देण्यासाठी आले, परंतु त्यांना काही विचित्र क्रिया वाटल्या ज्यानंतर प्रत्येकजण घाबरले. या घटनेनंतर ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या बर्‍याच जणांना अचानक बैचन वाटू लागले. या घटनेनंतर कोणही एकटा व्यक्ती या ठिकाणी जात नाही.

संपादन- भूषण श्रीखंडे