esakal | उन्हाळाच्या सुट्टी घालविण्यासाठी 'बोडमिल' शहर हे उत्तम ठिकाण
sakal

बोलून बातमी शोधा

bomdila

उन्हाळाच्या सुट्टी घालविण्यासाठी 'बोडमिल' शहर हे उत्तम ठिकाण

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः उन्हाळाच्या सुट्टींमध्ये भारतीय लोक आपला वेळ घालविण्यासाठी चांगल्या स्थळांच्या शोधात नेहमी असतात. जिथे त्यांना गारवा आणि शांतता हवी असते. असाच अनुभव भारतामध्ये अरुणाचल प्रदेशातील 'बोडमिल' शहरात मिळतो. तसेच शांततात बरोबर नैसर्गीक सैंदय, हिमालयाच्या पर्वत रांगा, बौद्ध जमात, तिबेट वारसा तुम्हाला जवळून पाहण्याची संधी आहे. तर चला जाणून घेवू 'बोडमिल' शहराबद्दल...

'बोडमिल' मठ

अरुणाचल प्रदेश आणि भारतात सर्वात पवित्र आणि पर्यटकांसाठी सर्वात महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे बोडमिल मठ. हे बौद्ध अनुयायांचे श्रद्धा स्थानापैकी एक प्रमुख केंद्र आहे. हे मठ तीन वेगवेगळ्या भागात बांधले गेले असून जर दूरवरून पाहिल्यास डोंगराच्या मध्यभागी हा मठ एक अद्भुत राजवाडा बांधला असल्याचा अभास होतो. हा मठ 1965 साली बांधला गेला असल्याचे म्हणतात. येथे बौद्ध लामा व भिक्षू यांचेही निवासस्थान आहे.

आरआर हिल्स

बोडमिल शहरातील एक उत्तम ठिकाण म्हणजे आरआर हिल्स. येथून हिमालयाचे अद्भुत दृश्ये पाहण्यास मिळते. तसेच थंड वाऱ्यांचा अनुभव घेवून तुम्ही येथे प्रसंन्न नक्की होसाल. असे म्हणतात की येथून भूतान आणि तवांगचे रस्ते सहज दिसतात.

बोंमडिला व्हू पाईंट

बोमडिला शहरा जवळ आणखी एक सुंदर जागा असून तीला बोंमडिला व्हू पाईंट असे म्हणतात. येथून आपण भूतानला बसलेल्या हिमालयातून सहज पाहू शकता. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गपेक्षा कमी नाही. पर्वतांच्या चित्तथरारक दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे.

एग्लेस्टेस्ट वन्यजीव अभयारण्य

आपल्याला सुंदर निसर्गात पक्ष्यांच्या अभयारण्यात फिरण्याची संधी आणखी मनोरंजक बनवतो. बोडमिलचे अलेनेस्ट वन्यजीव अभयारण्य अशाच काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की या अभयारण्यात चारशेहून पक्षींच्या अधिक प्रजाती दिसतात.