esakal | राजस्थानचा इतिहास जाणायचायं..तर या संग्रहालयांना नक्की भेट द्या !
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थानचा इतिहास जाणायचायं..तर या संग्रहालयांना नक्की भेट द्या !

राजस्थानचा इतिहास जाणायचायं..तर या संग्रहालयांना नक्की भेट द्या !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः तुम्हाला कोणत्याही राष्ट्राचा आणि राज्याचा संपूर्ण इतिहास (history) बारकाईने जाणून घ्यायचा असेल पुरातन आणि प्रसिद्ध (famous) संग्रहालयात(museums) तुम्हाला माहिती मिळेल. तर राजस्थान हे एक राज्य आहे ज्यांचा इतिहास भारतीय इतिहासाला खूप महत्वाचा आहे. मुघल साम्राज्याचा इतिहास (Mughal history) आणि ब्रिटीश काळाचा इतिहास (British history) प्राचीन इतिहास येथे जतन केला आहे. त्यात राजस्थानमध्ये(rajasthan) अशी काही संग्रहालये आहेत, जिथे आपण संपूर्ण संपूर्ण इतिहास जाणून घेवू शकतो.

( indian history rajasthan museums famous information)

अहाड संग्रहालय

अहार (अहाड) संग्रहालय, उदयपुरातील एक प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध संग्रहालय आहे. प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत वापरल्या जाणार्‍या कुंभारकाम येथे पाहण्यास मिळेल. ब्रिटिश काळापासूनही बर्‍याच गोष्टी आपण पाहू शकतो. आपण इतिहास आणि कला-संस्कृतीचा अदभुत गोष्टी तुम्ही पाहू शकतात.

अल्बर्ट हॉल संग्रहालय

राजस्थान राज्यातील तसेच जयपूर शहरातील अल्बर्ट हॉल संग्रहालय सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन संग्रहालय आहे. हे सार्वजनिक संग्रहालय म्हणून 1887 मध्ये उघडले गेले. असे म्हटले जाते की लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून या संग्रहालयाने आपले नाव आणि डिझाइन घेतले होते. अल्बर्ट हॉल संग्रहालयात बरीच जुनी पेंटिंग्ज, रग, हस्तिदंत, मौल्यवान दगड, धातू, शिल्पे आणि बरीच रंगीबेरंगी वस्तू आढळतात.

अजमेर संग्रहालय

राजस्थानबरोबर अजमेरचा इतिहास जवळून जाणून घ्यायचा असेल आणि मध्ययुगीन काळात मोगल राज्यकर्त्यांचा संपूर्ण इतिहास अजमेर संग्रहालयात पाहण्यास मिळेल. या संग्रहालयात शिल्पे, नाणी, हस्तकला, ​​साधने इत्यादी सहजपणे पाहू शकता. असे म्हटले जाते की मोगल बादशाह अकबरशी संबंधित अनेक गोष्टीही आहे.