esakal | ही..आहेत भारतातील 10 सर्वोत्तम विवाहासाठी स्थाने

बोलून बातमी शोधा

हे आहेत भारतातील 10 सर्वोत्तम विवाहासाठी स्थाने
हे आहेत भारतातील 10 सर्वोत्तम विवाहासाठी स्थाने
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः राजेशाही शैलीत लग्न करणाऱ्यांची कमी नसून भारतात हा नविन ट्रेंड खूप वाढला आहे. लग्नाला संस्मरणीय बनविण्यासाठी लोक अनेक ठिकण असे आहे की तेथे लग्नसमारंभ कार्यक्रम अस्मरणीय होतो. तर चला जाणून घेवू अशा दहा ठिकाणांची माहिती..

केरळ

केरळ राज्य हे निर्सगसंपन्न असून येथे समुद्रकिनारे, जंगल, पवर्तरांगा या प्रसिद्ध आहे. तसेच डेस्टिनेशन वेडिंगसाठी केरळला अनेक लोक पसंती देतात. कोवलममधील लीला ही भारतातील एक उत्तम विवाह विवाह रिसॉर्ट आहे. येथे सप्टेंबर ते मार्च या महिन्यात लग्न करणे चांगले आहे.

ऋषिकेश

पवित्र शहरात ऋtषिकेशमध्ये लग्न करणे हा एक वेगळा अनुभव आहे. लग्न करण्यासाठी दुरूदुरून जोडपी येथे येत असतात. येथील प्रसन्न वातावरण, सुंदर मंदिरे आणि निसर्ग लोकांना आवडत आहेत. येथे विवाह सोहळ्यासाठी गंगेच्या काठावर उत्तम स्थान आहे. राजाजी नॅशनल पार्क हे लोकप्रिय ठिकाण आहे. ऑक्टोबर ते मार्च महिना हा लग्नासाठी चांगला मानला जातो.

गुजरात

संस्कृती आणि वारसा असा ओळखल्या जाणाऱ्या गुजरात मध्ये रॉयल लग्न करण्याचा ट्रेड आहे. बरेच शाही किल्ले आणि भव्य लग्ने स्थळे आहेत ज्यात लग्नाची संपूर्ण व्यवस्था शाही पद्धतीने केली जाते. हवामानानुसार नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा काळ हा लग्नासाठी सर्वोत्कृष्ट आहे.

जयपूर

तुम्हाला वाड्यांमध्ये राजेशाही लग्नाची इच्छा असेल तर जयपूरमध्ये लग्न करू शकतात. येथील जय महल पॅलेस हा लोकांच्या पसंतीस उतरतो. या राजवाड्यात लग्न करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. येथे लग्नासाठी हिवाळा हा चांगला काळ आहे.

गोवा

गोवा हे केवळ पार्टी साठी प्रसिध्द नसून लग्न समारंभासाठी देखील प्रसिध्द आहे. त्यामुळे गोवा बीच लग्नासाठी खूप प्रसिद्ध आहे. गोवा लग्नाच्या विलासी गंतव्यस्थानांपैकी एक आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा महिना येथे सर्वोत्कृष्ट आहे.

मसूरी

डोंगरांवर लग्न करण्याचे स्वप्न पाहत असाल तर मसूरी तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जेडब्ल्यू मॅरियट वॉलनट ग्रोव्ह रिसॉर्ट अँड स्पाॅ येथे येथे अशा सुविधा आहे. येथे अधिक पाहुण्यांसाठी जागा उपलब्ध आहे.

शिमला

निर्सगाच्या सन्निध्यात लग्न करण्याचा तुमचे नियोजन असेल तर येथे बरेच रिसॉर्ट्स आहेत. त्यांच्या वतीने लग्नाच्या सर्व व्यवस्था करतात. जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे तणाव येऊ नये आणि आपण लग्नाचा आरामात आनंद घेऊ शकता. शिमल्यात लग्न करण्यासाठी उन्हाळा चांगला असतो.

उदयपूर

रॉयल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये उदयपूर देखील खूप लोकप्रिय आहे. संस्कृती आणि वास्तू यांचा समृद्ध वारसा, माणसे येथे आकर्षित करतात. तलावांनी वेढलेले उदयपूर हे भारतातील एक सर्वाधिक रोमँटिक शहर आहे. 

मथुरा

मथुरा एक प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तेथे बरेच सुंदर रिसॉर्ट्स आहेत जे डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वोत्तम आहेत. भगवान श्री कृष्ण शहरात लग्न करणे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे आपल्यासाठी आश्चर्यकारक असेल. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात येथे विवाह आयोजित करणे चांगले मानले जाते.

अंदमान निकोबार

समुद्र किनारी विवाह करायचा असेल तर अंदमान निकोबार आपल्यासाठी योग्य जागा आहे. अंडमान निकोबार डेस्टिनेशन स्वच्छ समुद्रकिनारा आणि सुंदर दृश्यांमुळे लग्नासाठी लोकप्रिय होत आहे. अंदमानचे भव्य रिसॉर्ट्स आणि येथील पाहुणचार आपल्या मनाला स्पर्शून जाईल. सप्टेंबर ते मे महिना हा लग्नासाठी चांगला मानला जातो.