esakal | दार्जिलिंग हिलस्टेशनमध्ये या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या..
sakal

बोलून बातमी शोधा

Darjeeling

दार्जिलिंग हिलस्टेशनमध्ये या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या..

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले तसेच भारतात (India) नव्हे तर जगात प्रसिध्द असलेले हिल स्टेशन पश्चिम बंगाल राज्यात (West Bengal) दार्जिलिंग (Darjeeling) मध्ये आहे. अतिशय सुंदर नैसर्गिक संपन्न असलेले शहर असून येथे चहाच्या बागा प्रसिध्द आहे. तसेच हिमालयन रेल्वेच्या टॉय ट्रेनसाठी (Toy train) प्रसिध्द असून बरेच ठिकाण फिरण्यासाठी अतिशय चांगले आहे. चला तर जाणून घेवू दार्जिलिंग बद्दल...

रॉक गार्डन

रॉक गार्डन

रॉक गार्डन

दार्जिलिंगम शहरापासून दहा किलोमीटरच्या अंतरावर रॉक गार्डन असून या बागेत दगड तोडून विविध कलाकृती सर्वांचे लक्ष वेधते. तर रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित हे गार्डन त्यात एक धबधबा असून तो पर्यटकांना आकर्षित करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

घुम मठ

घुम मठ

घुम मठ

दर्जिलिंगमध्ये या हिल स्टेशनवरील सर्वात उंचावर घुम मठ आहे. आठ हजार फूट उंचीवर स्थित याला यिगा चोयलिंग देखील म्हणतात. याची स्थापना १८५० मध्ये लामा शेराब ग्यात्सो यांनी केली होती आणि दार्जिलिंगमधील सर्वात प्राचीन तिबेट मठ मानला जातो. हे मैत्रेय बुद्धाच्या 15 फूट उंच पुतळ्यासाठी देखील ओळखले जाते, तसेच दुर्मिळ बौद्ध हस्तलिखिते, शिलालेखांचे संग्रहाल येथे आहे. येथील आकर्षकाचे केंद्र हे बौद्ध आणि तिबेटी कला पाहण्यास मिळतात. तसेच या डोंगरावराच्या माथ्यावर माँ कालीचे एक सुंदर मंदिर आहे.

बस्तासिया लूप

बस्तासिया लूप

बस्तासिया लूप

बस्तासिया लूपचा रेल्वे ट्रॅक दार्जिलिंगची सर्वात सुंदर रेल्वे मार्ग असल्याचे म्हटले जाते. ट्रॅक एका टेकडी व बोगद्यातून जातो आणि त्याभोवती सुंदर फुलांचे आणि वनस्पती या दिसतात. कांचनजंगाच्या बर्फाने भरलेल्या टेकड्याचे सुंदर दृष्य येथून आपण पाहू शकतात.

टायगर हिल

टायगर हिल

टायगर हिल

दार्जिलिंगपासून 13 किलोमीटर अंतराव टायगर हिल सुमारे 2590 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणावरून सूर्योदय पाहण्याचा एक थरारक अनुभव आपण्यास मिळेल. येथून कांचनजंगाच्या शिखराच्या सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकतो. या जागेबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ती म्हणजे घुम, युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ तसेच दार्जिलिंगमधील सर्वोच्च रेल्वे स्थानक आहे.

loading image
go to top