esakal | भारतातील काही विलोभनीय पर्यटनस्‍थळे
sakal

बोलून बातमी शोधा

india tourism place

भारतातील काही विलोभनीय पर्यटनस्‍थळे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सध्या कोरोनामुळे देशात बरीच पर्यटनस्थळे बंद आहेत. देशात प्रत्येक राज्यातील तिथली विशेषतः आहे. त्या-त्या राज्यांची संस्कृती आहे. प्रत्येक राज्यात मोठी आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या भागात अनेक विलोभनीय स्थळे आहेत. चला तर त्यातील काही स्थळांबद्दल जाणून घेऊया-

आग्रा

इथं जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल आहे. हे पर्यटनस्थळ पर्यटकांचे नेहमीच प्रमुख आकर्षण केंद्र राहिलेले आहे. इथं ताजमहलासोबत आग्र्याचा किल्ला, फतेहपुप सिक्री, अकबराची समाधी, रामबाग आणि सिकंदर चा किल्ला अशी मोठी स्थळे आहेत.

काश्मीर

काश्मीर आपल्या उत्कृष्ट सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. काश्मीरमधील निसर्गरम्य स्थळांमध्ये श्रीनगर, गुलमर्ग, डालझिल, नागिन तलाव, परी महल आणि पहलगाम आहेत. प्रेक्षणीय स्थळे आणि डोंगरावर वसलेली पर्यटकांना खुणावत असतात.

गोवा

गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे जे आपल्या विस्तीर्ण आणि सुंदर समुद्रकिनार्‍यांसाठी ओळखले जाते. इथले सीफूड, वॉटर स्पोर्ट्समुळे हे एक मनोरंजक ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे असलेला अलोना किल्ला, गोवा संग्रहालय, चपोरा किल्ला ही इतर पर्यटकांची आकर्षणे आहेत.

कन्‍याकुमारी

कन्याकुमारीला केप कोमोरिन म्हणूनही ओळखले जाते. येथे हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्र येतात. सूर्यास्ताच्या विहंगम दृश्याचे दर्शनही येथून होते.

जयपुर और उदयपुर

राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूर ही शहरे तिथल्या कलात्मक आणि स्थापत्य सौंदर्यासाठी ओळखले जातात. उदयपूर मधील लेक पॅलेस जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. जयपूरमध्ये हवामहाल देखील आहे, जे आर्किटेक्चरचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.

केरळ

केरळ हे भारतातील अत्यंत निपुण आणि सुशिक्षित राज्यांपैकी एक आहे. इथली हिरवीगार सुंदरता आणि नद्यांमध्ये बोटिंगचा आनंद लाजवाब आहे.

दिल्‍ली

दिल्ली हे भारताचे आर्थिक केंद्र आहे आणि देशाची राजधानी देखील आहे. दिल्लीतील इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, जामा मशिद आणि कुतुब मीनार पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येत असतात.

दार्जिलिंग

दार्जिलिंगला देशातील पर्वतांची राजधानीही म्हटले जाते. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2134 मीटरवर आहे. दार्जिलंग जगभरात चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

loading image