चन्नईतील ही आहेत 'बेस्ट' कॅफे..तुम्हाला जायला नक्की आवडेल

मजेशीर दिवस घलावण्यासाठी भरपुर खरेदीचे ठिकाण स्वादिष्ट पदार्थांचे ठिकाण आहे
cafes
cafes

जळगावः प्रत्येक शहराची वेगळी ओळख असते त्यात तेथील रुचकर पदार्थापासून (Delicious food) ते नैसर्गिक ठिकाणा पर्यंत. चेन्नईचा (Chennai) विचार केला तर येथे विविध पदार्थांचे हाॅटेल व कॅफेनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि येथे गेल्यावर खवय्यांना तोंडाला नक्की पाणीसुटेल. येथे मजेशीर दिवस घलावण्यासाठी भरपुर खरेदीचे ठिकाण स्वादिष्ट पदार्थांचे ठिकाण आहे. तर चला जाणून घ्या चन्नई मधील कोणत्या कॅफेला भेट द्यायची...

चाय विला कैफे
चाय विला कैफे

चाय विला कैफे

वेगवेळ्या चहा आनंद घ्यायचा असेल तर चाय व्हिला कॅफे चेन्नईमधील एक उत्कृष्ट ठिकाण आहे. येथे तुम्हाला तब्बल ६२ पेक्षा अधिक चहा प्रकार पिण्यास मिळले. पहिल्या मजल्यावर तुम्हाला कॅफेसारखे वातावरण मिळेल आणि दुस मजल्यावर तुम्हाला छान जेवण मिळेल. चहा, कॉफी आणि रुचकर पदार्थांबरोबरच तुम्हाला इथे स्वादिष्ट मिठाई देखील मिळेल. या कॅफेमध्ये आपणास एक उत्तम वातावरण, सुंदर सजावट आणि शांत वातावरण मिळेल.

कैफे अरेबिका
कैफे अरेबिका

कैफे अरेबिका

चेन्नई मधील खाद्य प्रेमींचे आवडीचे ठिकाण म्हणजे कॅफे अरेबिक असून येथे ताजे बेक केलेले केक, पेस्ट्री, स्मूदी, आईस्क्रीम पासून आपल्याला काचेच्या प्रदर्शनात सुंदरपणे सजवलेल्या अनेक मिष्टान्नांचा आनंद घेण्याची संधी मिळेल. तसेच मिठाई व्यतिरिक्त , शाकाहारी व मांसाहारी पदार्थ सँडविच, बर्गर, रॅप्स, फ्राय आणि विविध प्रकारचे पेयांचा आनंद देखील मिळेल.

शिराज आर्ट कैफे
शिराज आर्ट कैफे

शिराज आर्ट कैफे

जर चन्नईमध्ये समुद्रकिनाऱ्यावर मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर शिराज आर्ट कैफे प्रसिध्द ठिकाण आहे. येथे पर्शियन खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळेल. येथे वांग्यांची कढीपत्ता आणि केशर तांदुळाची चव मिळेल. या व्यतिरिक्त येथे आपण कॅफेमध्ये खाल्ल्यानंतर शांतपणे समुद्रकिनारा लांब फिरण्यासाठी देखील जाऊ शकता.

द ब्रू रूम, कैफे
द ब्रू रूम, कैफे

द ब्रू रूम, कैफे

चेन्नईतील द ब्रेन रूम कैफै हे सर्वोत्कृष्ट कॅफे म्हणून ओळखले जाते. द डॉन हॉटेलच्या बागेत हे कैफे असून रविवारी भरपूर गर्दी असते. कॅफेमध्ये हाॅट चाॅकलेट आणि ब्राऊन प्रसिध्द आहे. याशिवाय अण्णा नगरमध्ये द ब्रू रूमची आणखी एक शाखा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com