esakal | हिल स्टेशनला जातयं..या महत्वाच्या गोष्टी नक्की सोबत घ्या !
sakal

बोलून बातमी शोधा

Travel

हिल स्टेशनला जातयं..या महत्वाच्या गोष्टी नक्की सोबत घ्या !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः उन्हाळ्याच्या हंगामात अनेक जण हिल स्टेशनला जाण्यासाठीचे नियोजन करतात. भारतात शिमला, मनाली, गुलमर्ग, मसूरी, नैनीताल, बीर आदी थंड हवेच्या (Hill Station) ठिकाणी पर्यटकांसाठी उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याचे आवडीचे ठिकाण आहे. अशा स्थितीत, जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात पहिल्यांदा या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी जाणार असाल तर या महत्वाच्या गोष्टी घेणे आवश्यक आहे. तुमची ट्रॅव्हल बॅग (Travel bag)तयार करतांना महत्वाच्या कोणत्या गोष्टी सोबत घ्यावे याची माहिती जाणून घेवू..

रेनकोट किंवा छत्री हिल स्टेशनला जाण्यापूर्वी तेथील हवामानाचा अंदाज घेणे आवश्यक आहे. जर हवामानानुसार पाऊस पडत असेल, तर तुम्ही रेनकोट किंवा छत्री सोबत घेणे आवश्यक आहे. कारण हिल स्टेशनवरील हवामान लगेच बदलत असतात. अचानक पाऊस आल्यास तुमच्या सोबतचा रेनकोट अथवा छत्रीमूळे तुम्ही ओले होणार नाही. आणि आजारी पडण्याची संभावणा देखील कमी होईल.

गाॅगल..

हिल स्टेशनवर जातांना गाॅगल (सन ग्लाॅस) हे महत्वाचे एक वस्तू आहे. पर्यटनस्थळांवर जास्त झाडे असतात तसेच उंचावर असल्याने सूर्याचे किरणे थेट डोळ्यांवर पडतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. मनाली, शिमला, मसूरी, नैनीताल इत्यादी ठिकाणी ट्रेकिंगसाठी सनग्लासेसची आवश्यकता असते. तसेच डोळ्यांचे संरक्षणासोबत तुम्हाला कुल लूक सुध्दा मिळतो.

स्पोर्टस बुट (शुज)

हिवाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी बॅग पॅक करतांना चांगल्या दर्जाचे व ट्रेकिंग व स्पोर्ट्ससाठी वापरतात असे शूज पॅक करणे आवश्यक आहे. कारण डोंगरावर चढतांना त्रास अथवा घसरण्याचा धोका त्यामुळे राहत नाही. तसेच शुच लाईट वेट असल्याने चालल्यानंतर पायही दुखत नाही. त्यामुळे लाईट वेट चांगल्या दर्जाचा शुज सोबत घ्यावा.

loading image
go to top