esakal | गुजरातच्या या राष्ट्रीय उद्यानात आहे निसर्गाचे अदभूत सौंदर्य
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat National Parks

गुजरातच्या या राष्ट्रीय उद्यानात आहे निसर्गाचे अदभूत सौंदर्य

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारताच्या (India) पश्चिमेकडील एक प्रमुख राज्य म्हणजे गुजरात (Gujarat) हे आहे. या राज्यातील संस्कृती(Culture), इतिहास आणि नैसर्गिक समृध्दी ही वाखण्याजोग आहे. तसेच समृध्द जंगल परिसरातील वन्यजीवांच्या प्रजाती तुम्ही पाहू शकतात. या राज्यातील राष्ट्रीय उद्याने (National Parks) जगप्रसिध्द असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक तसेच पर्यावरण प्रेमींची गर्दी असते. येथे वन्य प्राण्यांचे तसेच अशियायी सिंह देखील आढळतात चला तर जाणून घेवू गुजरात राज्यातील या राष्ट्रीय उद्यानांबद्दल..

गिर राष्ट्रीय उद्यान

गिर राष्ट्रीय उद्यान

गिर राष्ट्रीय उद्यान

जगात तसेच संपूर्ण भारतात गिर राष्ट्रीय उद्यान हे प्रसिध्द आहे. हे उद्यान अनेक प्रकारचे वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असून सुमारे 1965 मध्ये हे उद्यान स्थापन झाले. उद्यान अशियायी सिंहांचे निवासस्थान मानले जाते. 2001 च्या एका गणनेनुसार, या राष्ट्रीय उद्यानात सुमारे 411 सिंह होते. या उद्यानात सिंहांव्यतिरिक्त 2 हजारांहून अधिक प्राण्यांच्या प्रजाती आहेत. हे उद्यान बिबट्या, हरण, हायना, सांबर हरण आदी वन्यप्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.

खिजडिया पक्षी अभयारण्य

खिजडिया पक्षी अभयारण्य

खिजडिया पक्षी अभयारण्य

गुजरातच्या जामनगरपासून सुमारे 12 किमी अंतरावर खिजडिया पक्षी अभयारण्य उद्यान आहे. हे उद्यान 400 पेक्षा जास्त प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असून या उद्यानात गोड्या पाण्याचे तलाव पर्यटाकांचे लक्ष वेधतो. निसर्गप्रेमी तसेच पक्षीप्रेमींसाठी हे नंदनवनच आहे.

मरीन नॅशनल पार्क

मरीन नॅशनल पार्क

मरीन नॅशनल पार्क

गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील कच्छच्या आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर मरीन नॅशनल पार्क हे वसलेले आहे. एक अतिशय सुंदर उद्यान असून सुमारे 500 चौरस किलोमीटर परिसरात हे पसरलेले आहे. या पार्कमध्ये जंगली मांजर, समुद्री कासव, फ्लेमिंगो आणि इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. हे 1982 साली स्थापन केलेले असून हे सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. येथे सुमारे 42 बेटांचा समावेश आहे.

वसंदा राष्ट्रीय उद्यान

वसंदा राष्ट्रीय उद्यान

वसंदा राष्ट्रीय उद्यान

गुजरात मधील नवसारी जिल्ह्यात वंसदा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिध्द आहे. वंसदा महाराजांच्या अधिपत्याखाली असलेले हे उद्यान आज हजारो विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींसाठी ओळखले जाते. हे उद्यान निसर्ग प्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे हरीण आणि बिबट्या हे या उद्यानाचे मुख्य प्राणी आहेत.

loading image
go to top