esakal | भारतातील ५ स्थळे जी दिसतात परदेशासारखी..तुम्ही नक्की भेट द्या !
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmir

भारतातील ५ स्थळे जी दिसतात परदेशासारखी..तुम्ही नक्की भेट द्या !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः परदेशासारखी दिसणारी भारतात (India) अनेक ठिकाणे असून जर तुम्ही या ठिकाणी गेला तर तुम्हीही चकित व्हाल आणि कदाचित आपण भारतात आहो, का परदेशात (Foreign Country) याचा नक्की आपणाला प्रश्न पडेल. चला तर जाणून घेवू भारतातील अशा ठिकाणांबद्दल..

लक्षद्वीप

लक्षद्वीप

लक्षद्वीप

मालदीव म्हतले की सुंदर समुद्रे किनारे आणि सेलिब्रिटींसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे क्रिस्टल क्लिअर वॉटर, सुंदर समुद्रकिनारे आणि तेथील आलिशान रिसॉर्ट्स आहे. तुम्हाला भारतातही असाच अनुभव घ्यायचा तर भारताचे लक्षद्वीप हे मालदीवसारखेच आहे. सुंदर समुद्र किनारे, निळसर पाणी, समृद्ध सागरी जीवन, सुंदर लँडस्केप, नैसर्गिक सौंदर्य आणि मोहक परिसर तुम्हाला नक्की भुरळ घालेल.

अल्लेप्पी

अल्लेप्पी

अल्लेप्पी

दक्षिणेतील केरळ राज्यातील अलेप्पी हे ठिकाण पाण्याचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. येथे गेल्यास तुम्हाला व्हेनिस शहराची आठवण येईल. येथे सुंदर बांधलेली जुनी चर्च येथील नैसर्गिक सौंदर्याची भर पडते. तर दरवर्षी ऑगस्ट दरम्यान सर्प बोट शर्यतीचे आयोजन केले जाते, जे मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिकांना आकर्षित करते. येथे भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा महिना.

गुलमर्ग

गुलमर्ग

गुलमर्ग

काश्मीरमधील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण म्हणजे गुलमर्ग आहे. हे सुंदर शहर श्रीनगरपासून 52 किमी दूर आहे. गुलमर्ग गोंडोला हे आशियातील सर्वात उंच आणि सर्वात लांब केबल कार प्रकल्प आहे. गुलमर्गचे सौंदर्य आणि त्याची बर्फाच्छादित शिखरे अगदी स्वित्झर्लंडसारखी दिसतात. आणि आपण स्वित्झर्लंजमध्ये आहोत का भारतात याचा आपणास प्रश्न नक्की पडतो. येथे एप्रिल, मे आणि जून फिरण्यासाठीची चांगली वेळ मानली जाते. तसेच बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर डिसेंबर ते मार्च ही चांगली चांगली वेळ आहे.

फ्लॉवर व्हॅली

फ्लॉवर व्हॅली

फ्लॉवर व्हॅली

उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात बरेच काही आढळते. यात जगप्रसिध्द एंटीलोप व्हॅली प्रमाणे व्हॅली आॅफ फ्लावर आहे. एंटीलोप व्हॅली ही उत्तर लॉस एंजेलिस काउंटी, कॅलिफोर्निया आणि केर्न काउंटी, कॅलिफोर्नियाच्या दक्षिण -पूर्व भागात स्थित आहे. तर भारतातील उत्तराखंडमधील व्हॅली आॅफ फ्लावर एक सुंदर बाग आहे, फुलांची जगप्रसिद्ध व्हॅली जी 87.50 किमी परिसरात पसरलेली आहे. फुलांची व्हॅलीला 1982 मध्ये युनेस्कोने राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले आहे. फ्लॉवर व्हॅलीमध्ये फुलांच्या 500 पेक्षा जास्त विविध प्रजाती आहे. व्हॅलीला भेट देण्याचा उत्तम काळ जुलै ते ऑगस्ट आहे यावेळी संपूर्ण दरी रंगीबेरंगी फुलांनी गुंजत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ब्रह्मा कमळाची फुलेही इथे दिसतात.

पुडुचेरी

पुडुचेरी

पुडुचेरी

फ्रान्सची राजधानी पॅरिस हे अतिशय सुंदर शहर असून हे शहर संपूूर्ण जगात प्रसिध्द आहे. या शहराला 'सिटी ऑफ लव्ह', 'लाइट्स सिटी', 'फॅशन सिटी' अशी टोपणनावे देखील आहे. परंतू तुम्हाला पॅरिस सारखे शहर भारतात आहे याचा तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण पुडुचेरीला गेल्यावर पॅरीस शहरा प्रमाणे दिसते. पुडुचेरी शहराची विशेष गोष्ट म्हणजे हे ठिकाण जवळजवळ 300 वर्षांपासून फ्रेंच अधिकारात होते. त्यामुळे आजही फ्रेंच वास्तुकला आणि संस्कृतीची झलक पुडुचेरीमध्ये दिसते.

loading image
go to top