esakal | ऋषिकेश मधील हे धबधबे आहे अतिशय सुंदर..!
sakal

बोलून बातमी शोधा

waterfalls

ऋषिकेश मधील हे धबधबे आहे अतिशय सुंदर..!

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः भारतातील प्रसिध्द ठिकाणांमध्ये ऋषिकेश (Rishikesh Tourist Place ) स्थळ प्रसिध्द असून हे ठिकाण नैसर्गिक दृश्यांनी परिपूर्ण आहे. पावसाळ्यात ते अधिक आनंददायी दिसते. येथील लहान-मोठे सुंदर धबधब (Waterfalls)ज्यांचे सौंदर्य पावसाच्या दरम्यान दुप्पट होते. असे काही धबधबे आहेत, जिथे जाण्यासाठी काही अंतर चालत जावे लागते. चला जाणून घेवू धबधब्यांबाबत..

waterfalls

waterfalls

पाटणा धबधबा

ऋषीकेष मधील पाटणा धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला काही अंतर पायी जावे लागते. हा धबधबा पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. लक्ष्मण झुला ते पाटणा धबधबा हे अंतर 7 किमी आहे. धबधब्याव्यतिरिक्त येथे एक अतिशय सुंदर गुहा देखील आहे.

waterfalls

waterfalls

गरुडचट्टी धबधबा

ऋषिकेशमधील गरुडचट्टी धबधबा प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहे. धबधब्याव्यतिरिक्त येथे अनेक सुंदर दृश्ये असून येथे वेळ घालवायला आवडेल. लक्ष्मण झुलापासून 5 किमी अंतरावर असलेल्या नीलकंठ महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तेथून पायी जावे लागते. धबधब्याजवळ एक गरुड मंदिर देखील आहे, जे पर्यटकांना आकर्षीत करते.

waterfalls

waterfalls

नीरगढ धबधबा

नीरगढ धबधब्या ठिकाणी तुम्हाला शांतता मिळेल. लक्ष्मण झुलापासून 4 किमी अंतरावर आहे. येथून तुम्ही कर्णप्रयाग हरिद्वार रोडद्वारे येथे पोहोचू शकता. पावसाळ्यात लोक अनेकदा नीरगढ धबधब्याला भेट देतात. नीरगढ धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही बाईक किंवा स्कूटीनेही जाऊ शकता.

आइसबर्ग धबधबा

लक्ष्मण झुला ते आइसबर्ग धबधबा हे अंतर फक्त 4 किमी आहे. ऋषिकेशमधील आइसबर्ग सर्वात प्रसन्न धबधबा आहे. येथे एक गुहा देखील आहे, जी पर्यटकांना तेथे जायला आवडते.

loading image
go to top