esakal | उत्तराखंडमधील दीदीहाट हिल स्टेशन आहे अतिशय सुंदर..!
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तराखंडमधील दीदीहाट हिल स्टेशन आहे अतिशय सुंदर..!

उत्तराखंडमधील दीदीहाट हिल स्टेशन आहे अतिशय सुंदर..!

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः दिल्लीपासून सुमारे 450-500 किमी अंतरावर अनेक हिल स्टेशन असून यात डेहराडून, मसूरी, नैनीताल, औली, अल्मोडा, मोर्नी हिल्स आदी ठिकाणे आहे. परंतू दिल्ली जवळच अजून एक हिल स्टेशन असून जेथे तुम्ही एकदा भेट दिलीत, तुम्हाला इथे पुन्हा पुन्हा भेट द्यायला आवडेल. तर जाणून घेऊया उत्तराखंड मधील दीदीहाट हिल स्थळाबद्दल..

दीदीहाट हिल स्टेशन

उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ मधील दीदीहाट हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे घनदाट जंगले, उंच पर्वत, दऱ्या, कुरण, नद्या आणि हिमनद्यांना या हिल स्टेशनचे आणखी सौदंर्य वाढवते. हे स्थळ समुद्रसपाटीपासून 1 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले आहे.

हिमनदी

दीदीहाट मध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. हे लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असून आहे. दीदीहाटपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेले नामिक ग्लेशियर समुद्र सपाटीपासून 3 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे. या ठिकाणी अनेक धबधबे देखील आहेत. नामिक हिमनदीला नंदा देवी, त्रिशूल आणि नंदा कोट शिखर पर्वतांनी वेढलेले आहे. हे ठिकाण फोटोग्राफीसाठी सुद्धा उत्तम ठिकाण आहे.

स्कॉट मस्क अभयारण्य

स्कॉट मस्क हरण अभयारण्य दीदीहाट हिल स्टेशन जवळ आहे. हिमालयात असलेले वन्यजीव अभयारण्य हे असून 600 चौरस किमी मध्ये पसरलेले हे अभयारण्य हरणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. या अभयारण्याला भारताचे ग्रीन पॅराडाइज देखील म्हटले जाते.

ट्रेकिंग

जर तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल तर दीदीहाट मध्ये जंगल आणि पर्वतांमधून ट्रेकिंग प्रवासाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. शहरापासून सुमारे 30 किलोमीटर दूर असलेल्या जौलजीबी स्थळाला देखील भेट देऊ शकता. हे सुंदर ठिकाण काली नदीच्या संगमावर आहे. तसेय येथील स्थानिक बाजारपेठेत खरेदी देखील करू शकता.

loading image
go to top