
Monsoon ghat travel guide for tourists in India: पावसाळ्यात घाटातील प्रवास हा आव्हानात्मक आणि जोखमीचा असू शकतो. कारण पाऊस, धुके आणि खराब रस्त्यांमुळे वाहन चालवणे कठीण होते. आषाढी एकादशी यंदा ६ जुलैरोजी साजरी केली जात आहे. अशा वेळी योग्य काळजी आणि खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसामुळे रस्ते निसरडे होतात, दृश्यमानता कमी होते आणि भूस्खलनाचा धोका वाढतो. त्यामुळे गाडी चालवताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. गाडीची योग्य तपासणी, सुरक्षित वेग, आवश्यक उपकरणे आणि हवामानाची माहिती यांचा विचार करणे गरजेचे आहे. या काळात प्रवास सुखकर आणि सुरक्षित बनवण्यासाठी काही खास टिप्स आणि खबरदारी घेतल्यास अपघात टाळता येतात आणि प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. चला, जाणून घेऊया पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी आणि खबरदारी घ्यावी.