Travel Diary : भारतातील प्रसिद्ध ठिकाणे जिथे केला जातो जादुटोना; कधी गेलात तर सांभाळून रहा!

आपण ज्या ठिकाणी फिरणार त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.
Travel Diary : भारतातील प्रसिद्ध ठिकाणे जिथे केला जातो जादुटोना; कधी गेलात तर सांभाळून रहा!

संपूर्ण जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. भटकंतीची आवड असलेल्या लोकांना अशा विचित्र ठिकाणी फिरायला आवडते. पण, आपण ज्या ठिकाणी फिरणार त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे आजही जादूटोणा केला जातो. म. (Travel Diary : Most famous cities for black magic in india)

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे आजही तुम्हाला काळी जादू किंवा तंत्रविद्या पाहायला मिळेल. वास्तविक, लोकांना असे वाटते की काळी जादू केल्याने त्यांची समस्या लवकरच दूर होईल.

Travel Diary : भारतातील प्रसिद्ध ठिकाणे जिथे केला जातो जादुटोना; कधी गेलात तर सांभाळून रहा!
Astro Tips : बाळाचे दातही देतात शुभ-अशुभ संकेत? 'या' महिन्यात दात येणे मानले जाते शुभ!

सुलतान शाही, हैदराबाद

काळ्या जादूसाठी हैदराबाद शहर ओळखले जाते. हैदराबाद काळ्या जादूचे केंद्र असल्याचेही म्हटले जाते. हैदराबादच्या सुलतानशाहीमध्ये पैसे घेऊन काळी जादू करणारे अनेक तांत्रिक आहेत. हैदराबादमधील चित्रिका, मुघलपुरा आणि शालीबंद या शहरातही काळी जादू केली जाते. काही तांत्रिक जादू टोणा करण्याच्या बदल्यात प्राण्याचा बळी मागतात. तर काहीजण महिलांकडे संभोगाची मागणीही करतात.

मायोंग गाव, आसाम

आसाममधील मायोंग गावात अनेक वर्षांपासून जादूटोणा करण्याची प्रथा आहे. भारतावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते. तेव्हा इंग्रजांनाही इथे येण्याची भीती वाटत होती. गावातील अनेक लोक आतापर्यंत बेपत्ता झाले असून काहींचा गूढ मृत्यूही झाला आहे. कधीकधी या गावातील लोक पशुही बनले आहेत. गावातील बहुतेक लोकांना काळ्या जादूची विद्या अवगत आहे. हे पिढ्यानपिढ्या सुरूच आहे, असे या गावातील लोकही सांगतात.

निमताळा घाट, कोलकाता

कोलकाताचा निमतळा घाट काळ्या जादूसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मृत लोकांवर अंत्यसंस्कार केले जातात. असे म्हणतात की, रात्रीच्या अंधारात या ठिकाणी अघोरी बाबा येतात आणि अंत्यसंस्कार केलेला मृतदेह खातात.

Travel Diary : भारतातील प्रसिद्ध ठिकाणे जिथे केला जातो जादुटोना; कधी गेलात तर सांभाळून रहा!
Madhuri Dixit : रेट्रो लुकमध्ये सजली धकधक गर्ल

कुशभद्रा नदी, ओरिसा

ओरिसात वाहणारी कुशभद्रा नदी देखील काळी जादू आणि तंत्रविद्येने भरलेली आहे. या नदीच्या आजूबाजूला आणि नदीच्या आतही अनेक मानवी हाडे आणि कवट्या सापडतात. देशभरातील सर्वात जास्त तंत्रसाधना या ठिकाणी केली जाते, अशी मान्यता आहे.

मणिकर्णिका घाट, वाराणसी

जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक वाराणसीची ओळख आहे, वाराणसी हे शहर धार्मिकतेसाठी ओळखले जाते. काशीसारखी पवित्र भूमीही काळ्या जादूपासून सुटलेली नाही. अनेक अघोरी बाबा मणिकर्णिका घाटावरील स्मशानभूमीत मृतदेहाचे मास खातात. मानवी मास खाल्ल्याने अघोरी शक्ती वाढते, असा त्यांचा विश्वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com