
How to Motivate Friends to Travel: 'आयुष्य हा एक प्रवास आहे, स्पर्धा नव्हे, तेव्हा मनसोक्त फिरा आणि आयुष्य एन्जॉय करा', असे नेहमी म्हटले जाते. फिरल्यामुळे आपले आयुष्य वाढते असे देखील गमतीने म्हटले जाते. त्यामुळे, आपल्या आयुष्यात फिरणे हा एक महत्वाचा भाग आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक जण थोडा वेळ काढून फिरायला जातात. खास करून लॉंग विकेंडला फिरायला जाण्यावर लोकांचा भर असतो. आणि यंदा स्वातंत्र्यदिनही शुक्रवारी आल्याने हा विकेंड लाँग विकेंड असणार आहे. त्यामुळे अनेकजणांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केलाच असेल.