
डेहराडून : हिंदू धर्मियांत चारधाम यात्रा महत्त्वाची मानली जाते. चारधाम मंदिराला दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या नियंत्रित करण्याची गरज एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) व्यक्त केली आहे. भाविकांची अनियंत्रित गर्दी धोकादायक ठरू शकते, असा इशाराही सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्युनिटीज (एसडीसी) या एनजीओने दिला आहे.