esakal | 'या' देशात फक्त चाळीस मिनिटांचीच असते रात्र
sakal

बोलून बातमी शोधा

'या' देशात फक्त चाळीस मिनिटांचीच असते रात्र

वास्तविक, वर्षातील काही महिन्यांत असे दुर्मीळ दृश्य येथे पाहायला मिळते.

'या' देशात फक्त चाळीस मिनिटांचीच असते रात्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जगातील अनेक ठिकाणे आहेत जी तेथील काही विशिष्ट गोष्टींमुळे चर्चेत राहतात. दिवसभराच्या धावपळीनंतर सुखाची झोप घेण्यासाठी बरेच जणांना आवडते. अशा झोपीपुढे आठ ते नऊ तास कमी पडतात. परंतु, जगातील असा एक देश आहे जेथे केवळ चाळीस मिनिटांचीच रात्र आहे. वास्तविक, वर्षातील काही महिन्यांत असे दुर्मीळ दृश्य येथे पाहायला मिळते. 

असे कोणते शहर आजे जेथे रात्र फक्त 40 मिनिटांची असते?

नॉर्वेमधील हॅमरफेस्ट हे शहर आहे, जेथे रात्र बारा वाजता होते. येथे सुर्य रात्री बारा वाजून ४३ मिनिटांनी अस्त होतो आणि अवघ्या चाळीस मिनिटात परत उगवतो. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास येथे पक्षांची किलबील सुरू असते. येथे असे एक-दोन वेळा होत नाही तर वर्षातील अडीच महिने असे होते. येथे सुर्यास्तच होत नाही त्यामुळे या शहराला याला 'मध्यरात्र सूर्याचा देश' देखील म्हणतात. मे आणि जुलै दरम्यान सुमारे 76 दिवस येथे सूर्यास्त होत नाही. असे सांगितले जाते की नॉर्वे आर्क्टिक सर्कलच्या आत येते.  

पूर्वेस नॉर्वेची सीमा स्वीडनला लागून आहे तर उत्तरेकडे या देशाची सीमा फिनलँड आणि रशियाला लागून आहे. नॉर्वे केवळ या कारणामुळेच प्रसिद्ध नाही तर तेथील सुंदर ठिकाणांमुळेही ते जगभर प्रसिध्द आहे. शिवाय हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. येथील लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागृत असतात. आरोग्यदायी खाण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. 

वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय कारणांमुळे येथे असे घडते

अंतराळात सूर्य स्थार आहे आणि पृथ्वी आपल्या कक्षेवर  365 दिवसांत सुर्याची एक कक्षा पूर्ण करते. तसेच, ती २४ तासांत अक्षावर एक फेरी पूर्ण करते. पृथ्वीच्या सूर्याच्या या प्रदक्षिणामुळे दिवस आणि रात्र होते. तेथे दिवस आणि रात्रीचा कालावधी नेहमीच सारखा नसतो. कधी दिवस मोठा असतो तर कधी रात्रा लहान असते, कधी दिवस लहान असतो तर रात्री मोठी असते. वास्तविक हे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्यामुळे होते. पृथ्वीचा कोणताच अक्ष असत नाही. पृथ्वी फिरत असताना एक उत्तर आणि दुसरा दक्षिणमध्ये बिंदू तयार होतात. या दोन्ही बिंदुंना सरळ रेषेत जोडले तर एक अक्ष तयार होतो. पृथ्वी आपल्या कक्षेतून 66 अंशांच्या कोनात फिरते. त्यामुळे तिचा अक्ष सरळ असत नाही तर तो २३ अंशाच्या कोनाच झुकलेला असतो. या अक्षाच्या झुकण्यामुळेच दिवस आणि रात्र लहान-मोठे होतात. २१ जून आणि २२ डिसेंबर या दोन दिवशी सुर्याची किरणे पृथ्वीच्या अक्षात झुकलेली असतात त्यामुळे पृथ्वी समान भागात पसरत नाही. साहजिकच दिवस आणि रात्रीच्या वेळांमध्ये फरक आहे. 
   
नॉर्वेमध्ये मध्यरात्री काळात एकविस जूनसारखी परिस्थिती असते. या काळात पृथ्वीचा संपूर्ण भाग 66 डिग्री उत्तर अक्षांश ते 90 अंश उत्तर अक्षांश पर्यंत सूर्य प्रकाशाखाली असतो. याचाच अर्थ येथे दिवस जास्त काळ तर रात्र कमी वेळ असते. जर नॉर्वेला जाण्याची संधी मिळाली तर मे पासून जुलैपर्यंत जावा. तरच तुम्हाला हा अनोखा अनुभव मिळेल.

असा बनवा शाही काजू हलवा

loading image
go to top