esakal | संत्रानगरी म्हणजे खवय्यांचीही राजधानी; अस्सल नागपुरी पोहे, तर्रीचा खमंग सुवास
sakal

बोलून बातमी शोधा

तर्री पोहा

संत्रानगरी म्हणजे खवय्यांचीही राजधानी; अस्सल नागपुरी पोहे, तर्री

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : संत्रानगरी नागपूर ही खवय्यांचीही राजधानी असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे येथे प्रत्येक ५० मीटर अंतरावर चना-पोहा, चहा, चायनीजचे रेस्टॉरंट आहेत. परंतु, काहींनीच चव जपल्याने त्यांच्याकडे खवय्यांची गर्दी होताना दिसते. यात दक्षिण नागपुरातील युफोरिया नाश्ता पॉइंट खवय्यांच्या पसंतीस पडले आहे.

दक्षिण नागपुरातील नंदनवन परिसरात अनेक लहान-मोठे स्टॉल आहेत. मात्र, उदय ढोमणे यांच्या युफोरियाने वीस वर्षांपासून चव व वेगळेपण जपले. त्यामुळेच दुपारपर्यंत व सायंकाळ ते रात्रीपर्यंत त्यांच्याकडे ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येतो. ढोमणे यांंनी २००० मध्ये रोजगाराच्या शोधात चना-पोह्याचा लहान स्टॉल सुरू केला. काही वर्षांमध्येच येथील खमंग तर्रीने नागरिकांना आकर्षित केले. काही वर्षांतच कुटुंब वाढले, त्याप्रमाणे नवनव्या युक्त्याही त्यांना सुचल्या.

नागरिकांचा चायनीजकडे वाढता कल बघता काळाची गरज ओळखून त्यांनी चायनीज तयार करण्यासही सुरुवात केली. सकाळी साडेसहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत चना-पोह्यासोबतच त्यांनी इडली, अप्पे, साबुदाणा, सांभारवडा आदी दक्षिणात्य पदार्थही तयार करून ग्राहकांच्या प्लेटमध्ये दिले. त्यामुळे दुपारी बारापर्यंत सर्वच प्रकारच्या ग्राहकांचा त्यांच्याकडे ओढा दिसून येत आहे.

हेही वाचा: उपराजधानी होतेय ‘सेक्स रॅकेट’चे केंद्र; ‘कॉन्ट्रॅक्ट’वर मुली शहरात

आता स्टॉलचे रूपांतर परिसरातील उत्तम रेस्टॉरंटमध्ये झाले. दुपारी विश्रांतीनंतर पुन्हा ते सायंकाळी रेस्टॉरंटला परततात ते चायनीज घेऊनच. तरुणांचा फास्ट फूडकडे कल बघता सायंकाळी पुलाव, पावभाजी, मंच्युरियन, फ्राईड राईस आदींचीही विक्री त्यांनी सुरू केली. त्यामुळे सायंकाळी तरुणाईचीही गर्दी त्यांच्याकडे दिसून येते.

ढोमणे यांच्या पदार्थांची चव बघता अनेक जण येथून पार्सल घेऊन जातात. वीस वर्षांत केलेल्या चवीचा अपवाद वगळता केलेल्या इतर बदलामुळे दक्षिण नागपुरातील त्यांचे रेस्टॉरंट प्रत्येकाच्या आवडीचे झाले आहे. विशेष म्हणजे ढोमणे येथे येणाऱ्या नागरिकांना ग्राहक म्हणून नव्हे तर घरी आलेल्या पाहुण्यांसारखेच ‘ट्रिट’ करतात. त्यांच्या स्वभावामुळेही त्यांनी वीस वर्षांत अनेक ग्राहकांना जोडून ठेवले आहेत.

हेही वाचा: नुसता दुधाचा चहा पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान

कमी पैशात चांगला पौष्टिक व चांगला आहार मिळावा या हेतूनेच चना-पोह्याचा स्टॉल सुरू केला. पुढे त्यात दाक्षिणात्य पदार्थ तसेच चायनीजचाही समावेश केला. रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे ग्राहकांना खाताना ‘हेल्थी’ वातावरणही मिळते. ग्राहकांकडून होणारी स्तुती ही पैशापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे पदार्थांची चव कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो.
- उदय ढोमणे, संचालक, युफोरिया नाश्ता पॉइंट, नंदनवन चौक
loading image
go to top