Palghar Tourism
esakal
विरार :मुंबईच्या महानगरीय गजबजाटापासून काही अंतरावर वसलेला पालघर जिल्हा म्हणजे निसर्गसौंदर्य, समृद्ध इतिहास, आदिवासी संस्कृती, अध्यात्म, साहस आणि समुद्रकिनाऱ्यांचा अनोखा मिलाफ. पर्यटनाच्या नकाशावर पालघरची ओळख केवळ “मुंबईजवळचा जिल्हा” एवढी न राहता, स्वतंत्र आणि वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून निर्माण करण्याची मोठी क्षमता या जिल्ह्यात आहे.
याच पर्यटनवैभवाला एकत्रितपणे जगासमोर आणण्याची मोठी संधी आहे.पालघर जिल्हा जिथून सुरु होतो त्या वसूलही मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख लाभली आहे. हा पर्यटनाचा प्रवास सुरु होतो ती वसईच्या किल्ल्यापासून पाणजू बेटापर्यंत पालघरच्या पर्यटनाची सुरुवात ऐतिहासिक वसई किल्ल्यापासून करता येते.