Indian Team Meet PM Modi: टीम इंडियाच्या खेळाडूंनी PM मोदींची घेतली सदिच्छा भेट, जाणून घ्या, पंतप्रधान निवासाची 'ही' खास वैशिष्ट्ये

अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे.
Indian Team Meet PM Modi
Indian Team Meet PM Modi
Updated on

अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे. संघाचे मायदेशी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर भारतात परतताच टीम इंडियाचा आनंदही गगनात मावेनासा झालाय. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलबाहेर भांगडा करत त्यांचा आनंद व्यक्त केला. दरम्यान, भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोक कल्याण मार्गावरील निवास्थानी सचिच्छा भेट घेतली. त्यानिमित्त जाणून घेऊयात पीएम हॉउसच्या खास गोष्टी.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवास्थान प्रशस्त आहे. दिल्लीतील लोक कल्याण मार्गावर (पूर्वीचा रेसकोर्स रोड) 12 एकराच्या परिसरात वसलेल्या या निवासस्थानामध्ये पाच बंगले आहेत. हे निवासस्थान राष्ट्रपती भवन आणि संसदेपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे.

Indian Team Meet PM Modi
Team India Arrives: अखेर टीम इंडिया विजयी ट्रॉफीसह मायदेशी; दिल्ली विमानतळावर चाहत्यांची तुफान गर्दी; Video

पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाहुण्यांची सोय आहे. कार्यालयं, बैठकासाठी खोल्या, एक थिएटर आणि हेलिपॅडही आहे. काही वर्षांपूर्वी इथून सफदरजंग विमानतळाला जोडणारा एक भुयारी मार्गही बनविण्यात आला होता.

सात कल्याण लोकमार्ग पूर्वी पंचवटी म्हणून ओळखला जात होता. भारताचे पहिले पंतप्रधान राजीव गांधी 1984 ते 2014 या काळात येथे राहिले होते. नरेंद्र मोदी 26 मे 2014 पासून या सरकारी बंगल्यात राहत आहेत. हे 1920 ते 1930 दरम्यान बांधले गेले. एडविन लुटियन्सच्या टीमचे वास्तुविशारद रॉबर्ट आर. रौसेल यांनी त्याची रचना केली होती.

Indian Team Meet PM Modi
Team India Breakfast: छोले भटुरे, चॉकलेट अन् बाजरीपासून बनवलेले पदार्थ, वर्ल्ड चॅंम्पियन टीम इंडियासाठी 'असा' आहे खास नाश्ता

विशेष म्हणजे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक नाही तर पाच बंगले आहेत. पंतप्रधान बंगला क्रमांक 5 मध्ये राहत असले तरी. याशिवाय या निवासस्थानी 1, 3, 7 आणि 9 क्रमांकाचे बंगलेही आहेत. या बंगल्यांची ड्रॉईंग रुम इतकी मोठी आहे की ३० जण एकत्र बसू शकतात. बंगला क्रमांक ७ मध्ये पंतप्रधानांचे कार्यालय आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले जवान बंगला क्रमांक 9 मध्ये राहतात.

12 एकरात पसरलेल्या या पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक मोठी बागही आहे. त्यात सेमल, गुलमोहर, अर्जुन ही झाडे लावली आहेत. मोरासह विविध प्रजातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात.

Indian Team Meet PM Modi
Team India Arrival : चाहत्यांच्या जनसागरात हरवली टीम इंडिया! दिवसाची सुरूवात रोहितनं तर शेवट केला हार्दिकनं

पंतप्रधानांच्या निवासस्थानी किमान ५० कर्मचारी काम करतात. याशिवाय AIIMS नवी दिल्लीचे डॉक्टर आणि परिचारिका 24 तास कर्तव्य बजावतात. पीएम हाऊसचे स्वतःचे स्वतंत्र पॉवर स्टेशन आहे. याशिवाय चित्रपट पाहण्यासाठी स्वतंत्र थिएटर स्क्रीनही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.