
Madhya Pradesh Hill Stations : मध्यप्रदेशला देशाचे हृदय असे म्हटले जाते. हे राज्य देशातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. या राज्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक येथे भेट देतात. मध्यप्रदेश हे राज्य प्राचीन गडकिल्ले, राजवाडे, हवेली, तलाव, धबधबे, वन्यजीव आणि हिल स्टेशन्ससाठी खास करून ओळखले जाते.
या राज्यात अनेक हिलस्टेशन्स आहेत. या हिलस्टेशन्सच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. त्यामुळे, पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. या राज्यातील तामिया हिलस्टेशन, पंचमढी हिलस्टेशन इत्यादी अशी अनेक हिलस्टेशन्स आहेत.
जिथे एकदा भेट दिल्यानंतर तुम्ही वारंवार भेट देण्यासाठी याल. आज आम्ही तुम्हाला मध्यप्रदेशातील या अशाच सुप्रसिद्ध हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणांना तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत नक्कीच भेट देऊ शकता. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.
तामिया हिलस्टेशनची उभारणी ही ब्रिटिश काळात झाली होती. हे हिलस्टेशन ट्रेकिंग, फोटोग्राफी, कॅम्पिंग इत्यादींसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग पाहण्यासारखा आहे. या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त पहायला विसरू नका. पातालकोट, कॅथेलिक चर्च आणि आदिवासी संग्रहालय इत्यादी ठिकाणांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य नयनरम्य असते.
मध्यप्रदेशातील सर्वात महत्वाच्या आणि पवित्र धार्मिक स्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. या ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी दररोज देशभरातील भाविकांची गर्दी असते.
नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर वसलेले हे ओंकारेश्वर पर्वतांनी वेढलेले आहे. या ठिकाणी सौंदर्य आणि धर्माचा अनोखा मिलाख पहायला मिळतो. ओंकारेश्वरसोबतच, तुम्ही या परिसरातील सिद्धनाथ मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, काजल राणी गुंफा आणि अहिल्या घाट इत्यादी पर्यटन स्थळांना नक्कीच भेट देऊ शकता.
मध्य प्रदेशातील सर्वात सुप्रसिद्ध असलेल्या हिलस्टेशनमध्ये या हिलस्टेशनचा पहिला क्रमांक लागतो. होशंगाबाद या जिल्ह्यात हे हिलस्टेशन स्थित असून भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये याचा समावेश केला जातो.
पंचमढी हिल स्टेशनच्या परिसरात टेकड्या, मनमोहक निसर्ग, धबधबे, गुहा आणि सुंदर जंगले आहेत. यासोबतच तुम्ही महादेव हिल्स, प्रियदर्शनी पॉईंट आणि सातपुडा राष्ट्रीय उद्यानाला ही भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.