
How to book a pre-wedding shoot at Lonar Lake: आजकाल लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याची क्रेझ वाढत चालली आहे. अनेक लोक निसर्गरम्य ठिकाणांना जाणे पसंद करतात. जर तुम्हाला बजेट फ्रेंडली आणि निसर्गरम्य ठिकाणी फोटोशुट करण्याचा विचार करत असाल तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरला भेट देऊ शकता.
कारण भारतीय पुरातत्व विभागाने लोणार सरोवर येथे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी खास नविन नियम लागू केले आहेत. लोणार सरोवर जगप्रसिद्ध असून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. येथे नौसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणी अविस्मरणीय फोटोशुट करू शकता.