

Ram Sita Vanvas Place
Esakal
Ram Sita Vanvas Place: हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एक असलेल्या रामायणात वर्णन आहे की भगवान श्रीराम, माता सीता आणि भ्राता लक्ष्मण यांनी आपल्या १४ वर्षांच्या वनवासातील मोठा काळ दंडकारण्य नावाच्या जंगलात व्यतीत केला. आज हेच दंडकारण्य आधुनिक छत्तीसगड राज्यातील बस्तर परिसरात पसरलेले आहे. ही भूमी आजही पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते.