
Rameshwaram Tourist Places: श्रावण महिना म्हटलं की भक्ती, देवदर्शन आणि तीर्थयात्रांचा काळ सुरू होतो. संपूर्ण भारतात हजारो भक्त या महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांना भेट देतात. तामिळनाडूमधील रामेश्वरम हे असंच एक पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थस्थान आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं रामनाथस्वामी मंदिर हे येथेच स्थित आहे आणि म्हणूनच या ठिकाणाला "दक्षिणेचं काशी" असंही म्हटलं जातं.