भारतातील सर्वात श्रीमंत गाव! बॅंकात ग्रामस्थांचे 5000 कोटी

madhapar
madhaparesakal

आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत. जे कदाचित देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत गाव असेल.. तर तुमचे काय मत असेल? हो हे खरं आहे. भारतातील गुजरात राज्यात एक असे गाव आहे. जिथे 17 बँका आहेत. ज्यात फक्त गावकऱ्यांचे 5000 कोटी रुपये जमा आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की त्याला गाव कसे काय म्हणणार? तर आम्ही तुम्हाला सांगतो की गावाची लोकसंख्या फक्त 92 हजार आहे. यानुसार, जर पाहिले तर या गावातील प्रत्येक नागरिकाकडे 15 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना...वाचा सविस्तर..

कोठे आहे हे गाव?

गुजरात राज्यातील कच्छमध्ये 'माधापार' सफेद वाळवंटासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. 12 व्या शतकात कच्छच्या मिस्त्री समाजाने स्थापन केलेल्या 18 गावांपैकी एक म्हणून हे ऐतिहासिक महत्त्व आहे. या मिस्त्री लोकांनी गुजरातची महत्वाची मंदिरे आणि इमारती बांधल्या. हळूहळू मधापारची प्रगती झाली आणि 1884 मध्ये पहिली मुलांची शाळा येथे आली. यानंतर 1900 मुलींची शाळा देखील उघडण्यात आली. यानंतर वेगवेगळे समुदाय येथे स्थायिक होऊ लागले आणि आता हे गाव गुजरातच्या सभ्यतेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. गावात जवळपास 7600 घरे आहेत. तिथे हे सर्व रहिवासी राहतात आणि येथे गावकरी स्वतः त्यांच्या शेतांची देखभाल करतात. इथले नागरिक ही घरं ना विकतात किंवा दूरच्या शहरांमध्ये जाण्याचेही प्रयत्न करत नाहीत.

गुजरातचे हे छोटे गाव शहरांपेक्षा श्रीमंत कसे झाले?

गुजरातचे हे गाव समृद्ध झाले. कारण येथील लोकांनी त्यांच्या गावाची चिंता करणे सोडले नाही. वास्तविक, येथील लोकांच्या कुटुंबातील कोणीतरी परदेशात स्थायिक झाले आहे, त्यापैकी बहुतेक अमेरिका, ब्रिटन, आफ्रिका, आखाती देशांचा भाग बनले आहेत. गावातील लोक बाहेर गेले असले तरी त्यांनी आपल्या गावाची चिंता सोडली नाही आणि कुटुंब आणि गाव समृद्ध करण्यासाठी पैशांची व्यवस्था करायला सुरुवात केली. रिपोर्टनुसार, 1968 मध्ये, लंडनमधील लोकांनी माधापार व्हिलेज असोसिएशनची स्थापना केली, ज्याला कच्छ माधापार कार्यालय असेही म्हटले जाते. बाहेरच राहणाऱ्या माधापारच्या नागरिकांना एकमेकांशी जोडता यावे आणि गावाबद्दल बोलता यावे म्हणून ही स्थापना करण्यात आली.

गावाची स्वतःची वेबसाइट

या गावाची स्वतःची वेबसाइट आहे ज्याचे नाव https://madhapar.uk/ आहे. या वेबसाईटवर तुम्ही गावाशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊ शकता तसेच येथे उपस्थित असलेल्या अनेक पर्यटन स्थळांची माहिती मिळवू शकता. या संकेतस्थळाच्या मते, या गावात 1858 मध्ये स्थापन करण्यात आलेले एक शंकराचे मंदिर देखील आहे, ज्याला बरीच मान्यता आहे. या गावात दोन तलाव देखील आहेत.

सर्व सुविधा उपलब्ध

या गावात सर्व सुविधा उपलब्ध आहेत- गुजरातच्या या गावात प्रत्येक सोईसुविधा आहे आणि गावकरी त्यांच्या जमिनीची विशेष काळजी घेतात. जे लोक बाहेर गेले आहेत ते येथे पैसे पाठवतात आणि इथल्या विकासाची जबाबदारी देखील उचलतात. माधापारमध्ये आज धरण, हिरवळ, तलाव, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल, बँक आदी सर्वकाही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com