जरा थांबा', उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road under bridge at Kurkumbh Mori in Daund 17 days mega block solapur

जरा थांबा', उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर...

सोलापूर : उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण दौंड येथील कुरकुंभ मोरी येथे रोड अंडर ब्रीज, (पुलाखालील रस्ता) काम हाती घेतले आहे. यामुळे 13 मे ते 29 मे दरम्यान तब्बल 17 दिवसांसाठी 33 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग तर काही गाड्या अंशतः शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवसात गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्यावतीने दौंड येथील कुरकुंभ मोरीच्या रोड अंडर ब्रिज च्या कामासाठी सतरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल एक्सप्रेस पॅसेंजर सेवेच्या मार्गात बदल, अनेक रेल्वेच्या सेवा रद्द केल्या जाणार आहेत. यासह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. परिणामी, प्रवाशांना या ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गिका खुली होईल अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

पंढरपूर-दादर एक्सप्रेस, सोलापूर-पुणे डेमू, मुंबई- पंढरपूर एक्सप्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, दौंड-पुणे डेमू, दौंड-पुणे शटल, बारामती-पुणे डेमू, पुणे-बारामती डेमू, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, पुणे-सोलापूर डेमू, पुणे-दौंड डेमू, पुणे-भूसावळ स्पेशल, बारामती-दौंड डेमू, भूसावळ- पुणे स्पेशल, दौंड-बारामती डेमू, पुणे-निझामाबाद डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-पुणे डेमू, निझामाबाद-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू, बारामती-दौंड पॅसेजर, निझामाबाद-पंढरपूर डेमू, पंढरपूर- निझामाबाद डेमू रद्द करण्यात आलेल्या आहेत.

आशिंक रद्द गाड्या

इंदोर-दौंड एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यत धावेल.

दौंड-ग्वाल्हेर एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यत धावेल.

हैद्राबाद-हडपसर एक्सप्रेस बार्शी टाऊन स्थानकापर्यत धावेल. बेंगलोर-मुंबई उद्यान एक्सप्रेस सोलापूर स्थानकापर्यत धावेल. नांदेड-पनवेल एक्सप्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यत धावणार आहे.

शार्ट ओरिजिनेटेड मेल एक्सप्रेस गाड्या

दौंड-इंदोर एक्सप्रेस ही पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार आहे. ग्वाल्हेर-दौंड एक्सप्रेस ही पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल. तर हडपसर-हैद्राबाद एक्सप्रेस बार्शी टाऊन स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल. मुंबई-बेंगलोर उद्यान एक्सप्रेस ही सोलापूर स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल. पनवेल-नांदेड एक्सप्रेस ही कुर्डुवाडी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार आहे.

मार्ग परिवर्तन झालेल्या गाड्या

विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.

काकिनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.

मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले. तिरूवनंतपुरम सेंट्रल-मुंबई एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.

मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले. पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले. लोकमान्य टिळक टर्मिनल – कराईकल एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले. साईनगर शिर्डी-चेन्नई एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.

उशिराने धावणाऱ्या मेल एक्सप्रेस

मुंबई –बेंगलोर एक्सप्रेस ही 2 तास उशीराने धावले.बेंगलोर-मुंबई एक्सप्रेस ही 1तास 10 मिनिट उशीराने धावले. नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस ही 1 तास 10 मिनिटे उशीराने धावले. नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस ही 1 तास 10 मिनिटे उशीराने धावले. तिरूवनंतपुरम सेंट्रल -मुंबई एक्सप्रेस ही 1 तास 10 मिनिटे उशीराने धावले. साईनगर शिर्डी-चेन्नई एक्सप्रेस ही 2 तास 30 मिनिटे उशीराने धावले. कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही 1 तास उशीराने धावले. मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस ही 1 तास उशीराने धावले. मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस ही 30 मिनिटे उशीराने धावले. मुंबई-चेन्नई एक्सप्रेस ही 2 तास उशीराने धावणार आहे. तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा. असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

दौंड यार्डमध्ये सबवे रोड अंडर बीच बांधण्याच्या कामासाठी आतापर्यंत अनेक मेगा ब्लॉक घेण्यात आले असून, आता पुन्हा एकदा 13 मे ते 29 मे दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक तब्बल 17 दिवसांचा असणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून वारंवार घेण्यात येत असलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असून, वाहतूकीची देखील समस्या निर्माण होते, मात्र ही समस्या सोडवण्यासाठी मागील ब्लॉकच्या वेळी स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभागाच्या वतीने वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Web Title: Road Under Bridge At Kurkumbh Mori In Daund 17 Days Mega Block Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top