

Shri Mata Vaishno Devi Yatra: दरवर्षी लाखोंची गर्दी करत असंख्य भाविक माता वैष्णोदेवी यात्रेला जात असतात. मात्र तेव्हा तेथील संस्थेला, स्थानिकांना आणि येणाऱ्या भाविकांना सुद्धा या गर्दीचा फार त्रास होतो. मात्र आता श्री माता वैष्णोदेवी यात्रेसाठी श्राईन बोर्डाने काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत आणि ते लगेच अंमलात आणले आहेत. या निर्णयाचा मुख्य हेतू भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि वाढती गर्दी नियंत्रित करणे हा आहे.