Summer Travel Tips
Summer Travel TipsSakal

Summer Travel Tips: जंगल सफारीचा आनंद होईल द्विगुणित, बॅगेत 'या' गोष्टी नक्की ठेवा सोबत

Summer Travel Tips: तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जंगल सफारीसाठी जात असाल तर बॅगमध्ये पुढील गोष्टी ठेवणे गरजेचे आहे.
Published on

keep these things in your bag while travelling jungle

उन्हाळ्यातील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक ट्रिप प्लॅन करतात. अनेक लोक जंगल सफारीला जाण्याचा प्लॅन करतात. भारतात अनेक मोठी आणि घनदाट जंगले आहेत. या हिरव्यागार जंगलांमध्ये विविध प्रकारचे वन्यजीव वास्तव्यास आहेत. भारतात विविध राज्यांमध्ये अनेक अभयारण्ये,जंगले आहेत.

जर तुम्हालाही जंगल सफारी करायची आवड असेल आणि तुम्ही उन्हाळ्यातील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जंगल सफारीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कोणत्या गोष्टी सोबत ठेवाव्या हे जाणून घेऊया. यामुळे तुमचा प्रवास अविस्मरणीय होईल.

  • सनस्क्रिन, बॉडीलोशन

तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जंगल सफारीला जात असाल तर त्वचेचे सूर्यापासून रंक्षण व्हावे यासाठी सनस्क्रीन, टोपी, सनग्लाससारख्या वस्तू बॅगमध्ये ठेवाव्या. जंगलातील डासांपासून संरक्षण करण्यासाठी ओडोमॉस सोबत ठेवावे. तसेच हँड सॅनिटायझर, मास्क यासारख्या गोष्टीसोबत ठेवणे गरजेचे आहे.

  • पोर्टेबल चार्जर

बॅगमध्ये पोर्टेबल चार्जर ठेवायला विसरू नका. अनेकदा अशा ठिकाणी वीज आणि चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसते.यामुळे तुम्हाला मोबाईल चार्ज करायला मदत मिळेल.

Summer Travel Tips
April Travel Places : कडक उन्हाळ्यात थंडावा हवाय? मग, ‘या’ ठिकाणी फिरायला जाण्याचा करा प्लॅन
  • कॅमेरा

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना तेथील आठवणीत जतन करण्यासाठी कॅमेरा, ट्रायपॉड यासारख्या गोष्टीसोबत ठेवाव्या. खरं तर प्रवासासाठी मोबाईल कॅमेरा देखील वापरू शकता.

  • सामान

जंगल सफारीसाठी तुम्ही तुमच्यासोबत महत्वाचे पण कमी सामान सोबत ठेवावे.यामुळे तुम्हाला प्रवासात त्रास होणार नाही.

  • औषधे

तुम्ही कोणत्याही प्रवासात जात असाल तर काही औषधे नेहमी सोबत ठेवावी. जंगल सफारीला जातानाही औषधे बॅगमध्ये ठेवावी. पेन किलर, अँटीसेप्टिक क्रीम, इतर गोळ्यासोबत ठेवाव्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com