पर्यटन सुरू होण्यापूर्वी ताडोबा-अंधारी हाऊसफुल्ल

पर्यटन सुरू होण्यापूर्वी ताडोबा-अंधारी हाऊसफुल्ल

नागपूर : राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील पर्यटनाला एक ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. नवेगावबांध-नागझिरा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या पाच दिवसांचे बुकिंग ७० ते ८० टक्के झालेले आहेत. ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानेही कोअरमधील पर्यटनाची दारे उघडली जाणार असल्याने पर्यटकांचा उड्या पडू लागल्या आहेत.

पेंच व्याघ्र प्रकल्पात ऑफलाइन पद्धतीने १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान प्रकल्पांच्या प्रवेशद्वारांवर सफारीचे बुकिंग करता येईल. १६ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने, १ नोव्हेंबर २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीत नियमित ऑनलाइन बुकिंग सेवा उपलब्ध राहील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती करण्यात आलेली आहे. सफारी दरम्यान सुरक्षित अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

पर्यटन सुरू होण्यापूर्वी ताडोबा-अंधारी हाऊसफुल्ल
माहेरी आलेल्या मुलीवर काळाचा घाला; अपघातात वडिलांसह ठार

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पिटेझरी, मंगेझरी, चोरखामारा, चोरखामारा दोन या प्रवेशद्वारावरील बुकिंग ३० सप्टेंबरपर्यंत हाऊसफुल्ल दाखवीत आहे. तर १ ऑक्टोबरपासून ७० ते ८० टक्के बुकिंग झालेले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, आता गाभा क्षेत्र उघडणार असल्याने पर्यटकांनी मोहुर्ली, कोलारा, पांगडी, झरी, नवेगाव या प्रवेशद्वारावरील बुकिंग ८० ते ९० टक्के बुक झाले असल्याची माहिती आहे.

पेंच व बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हाडला-पवनी अभयारण्यातील पर्यटन गेजवरून १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू करण्यात येत आहे. पर्यटन रस्ते आणि पावसाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पेंच प्रकल्पातील सिल्लारी, खुर्सापार, चोरबाहूली, कोलितमारा, सुरेवानी, खुबाळा, पवनी पर्यटन गेट, बोर प्रकल्पातील बोर पर्यटन गेट आणि उमरेड-कऱ्हाडंला-पवनी अभयारण्यातील कऱ्हांडला, गोठणगाव गेटवर १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने वाहन क्षमतेच्या मर्यादेत पर्यटन करता येणार आहे.

बोरधरण पर्यटन गेटवरील वाहन क्षमता १२ ठेवण्यात आलेली आहे. अडेगाव गेट पावसामुळे बंद आहे. पवनी गेट १५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पर्यटनासाठी उपलब्ध राहणार आहे. पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने सफारी बुकिंगची सुविधा १६ ऑक्टोबरपासून उपलब्ध राहणार आहे. पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग www.mahaecotourism.gov.in या वेबसाइटवर १० ऑक्टोंबरपासू करता येणार आहे.

पर्यटन सुरू होण्यापूर्वी ताडोबा-अंधारी हाऊसफुल्ल
मैत्रीपूर्ण संबंधात पती ठरायचा अडसर; मित्राच्या मदतीने केला ‘गेम’

पेंचचे पर्यटन शुल्क वाढणार

कोविड १९ संबंधी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, राज्य शासन, स्थानिक प्रशासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे पालन करणे पर्यटकांना अनिवार्य राहणार आहे. सध्या स्थितीत मागील वर्षाच्या पर्यटन शुल्कात बदल झालेला नाही. मात्र, नजीकच्या काळात यात बदल होऊ शकतो अशा वेळी पर्यटकांना आगाऊ आरक्षण केल्यास येणारी फरकाची रक्कम भरावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com