एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांनी घ्या 'ही' काळजी

भटकंती (traveling) करणं हा बऱ्याच जणांचा छंद असतो.
एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांनी घ्या 'ही' काळजी
Updated on

भटकंती (traveling) करणं हा बऱ्याच जणांचा छंद असतो. यात असेही काही जण आहेत ज्यांना ग्रुपसोबत न जाता एकट्यानेच प्रवास करायला आवडतो. आजच्या काळात याला सोलो ट्रीप असंही म्हणतात. विशेष म्हणजे या सोलो ट्रीप करण्यात स्त्रियादेखील मागे नाहीत. अनेक स्त्रिया (women) बिंधास्तपणे एकट्याच प्रवासाला निघतात. त्यामुळे अगदी हॉटेल बुकिंगपासून पर्यटन स्थळांना भेट देईपर्यंत सारं काही या स्त्रिया स्वतंत्रपणे आणि बिंधास्तपणे करत असतात. मात्र, सोलो ट्रीप करताना स्त्रियांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडेदेखील तितकंच लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच, सोलो ट्रीप करतांना स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात. (these things should be remembered by women traveling alone)

एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांनी घ्या 'ही' काळजी
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची करु शकता मदत

१. ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात ज्या जागेची व्यवस्थित माहिती करुन घ्या.

२. तुम्ही राहत असलेल्या हॉटेलची माहिती, पत्ता, फोटो व संपर्क क्रमांक कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा.

३. प्रवासादरम्यान तुमची वैयक्तिक माहिती शक्यतो कोणाला सांगू नका.

४. प्रवासादरम्यान लागणारे कागदपत्र, पासपोर्ट, तिकीट व्यवस्थित ठेवा.

५. तुम्ही एकट्याने प्रवास करताय हे इतरांना समजू देऊ नका.

६. आत्मविश्वासाने वावर करा.

७. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती साधने तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. उदा. पेपर स्प्रे, सेफ्टी अलार्म.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com