Marriage Anniversary Trip : लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताय, ही ठिकाणं आहेत बेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताय? ही ठिकाणं आहेत बेस्ट
Marriage Anniversary Trip : लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताय, ही ठिकाणं आहेत बेस्ट

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताय? ही ठिकाणं आहेत बेस्ट

लग्नाचा पहिला वाढदिवस लक्षात राहावा यासाठी कपल्स वेगवेगळ्या योजना तयार करत असतात. लग्नात आधीच खूप खर्च झालेला असतो. त्यात वर्षभर काहीना काही मोठे खर्च होतातच. अशावेळी कमी बजेटमध्ये जर फिरायला जायचे असेल तर काही ठिकाणं आहेत जेथे तुम्ही फिरायचा प्लॅन करु शकता.

उदयपूर - येथे तुम्हाला सुंदर तलाव आणि भव्य टेकड्या पाहायला मिळतात. लग्नाचा वाढदिवस विशेष करायचा असेल, तर तुम्ही तलावाजवळ जागा घेऊन तिथे राहू शकता. येथे जोडीदारासोबत शांततेत वेळ घालवणे फार रोमेंटिक असेल.

मुन्नार- हे शांत हिल स्टेशन खूप सुंदर आहे. इथल्या निसर्गाचा आनंद तुम्ही आवडीच्या माणसाबरोबर इथला आनंद घेऊ शकता. इथे तुम्ही लग्नाचा वाढदिवस छान साजरा करू शकता. येथे तुम्ही चहा, कॉफीच्या मळ्यात फिरू शकता.

पोंडिचेरी (पुडुचेरी)-
लग्नाच्या वाढदिवसासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, समुद्राजवळ राहू शकता. फ्रेंच पदार्थांचा आनंद घेऊ शकता.

पोंडिचेरी (पुडुचेरी)- लग्नाच्या वाढदिवसासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, समुद्राजवळ राहू शकता. फ्रेंच पदार्थांचा आनंद घेऊ शकता.

कोवलम- जर तुम्हाला लग्नाचा वाढदिवस समुद्रकिनारी साजरा करायचा असेल तर ही अतिशय चांगली जागा आहे. स्वच्छ पाणी आणि ताडाची झा़डे मन प्रसन्न करतील. गर्दीपासून दूर जात इथे जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवता येईल.

कुमारकोम- तुम्हाला हिरवागार निसर्ग पाहायचा असेल तर कुमारकोमला जा. येथे तुम्ही खूप आराम करू शकता. तसेच खूप फोटो काढू शकता. जोडीदारासोबत शांत ठिकाणी जायचा विचार करत असाल तर ही जागा अत्यंत योग्य आहे.

loading image
go to top