Tourism News : प्रवास करताना कोणत्या चूका टाळाव्या? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism news

Tourism : प्रवास करताना कोणत्या चूका टाळाव्या?

आपल्यापैकी अनेकांना प्रवास करायला आवडतो. काहीजणांनी तर उगाच भटकायलाही आवडतं. काही दिवसांत आता सुट्टीचे वेध लागायला सुरुवात होईस. दिवाळी, दसऱ्यानिमित्त अनेकजण सध्या बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असतील.

तुम्ही कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर या काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा प्रवास करत असताना प्रदेश नवीन असल्याने अनेक चुका आपल्याकडून होत असतात. प्रवासादरम्यान, तुम्हालाही या चुका टाळायच्या असतील तर ही बातमी तुम्हाला मदत करु शकेल.

हेही वाचा: दुधाची साय चेहऱ्यावर लावण्याचे फायदे; त्वचा दिसेल तरुण

पावसाळा असो किंवा हिवाळा सहलीचे प्लॅन बनवले जातात. आणि ही सहल संस्मरणीय व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. प्रवास करताना लोक अनेकदा अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना पश्चात्ताप करावा लागतो. यामुळे सहलीची मजा बिघडते.

अनेकदा प्रवासाला जाण्यापूर्वी आपण विचार करतो की आपण सर्व खाण्यापिण्याचे साहित्य ठेवावे, अशावेळी वाटेत काही वस्तू खराब होतात आणि त्यांना दूर्गंघी येऊ लागेत त्यामुळे दुर्गंधीयुक्त वस्तू पॅक करु नका. शक्यतो अशा वस्तू घेऊन जाणे टाळा.

अनेकदा लोक मौल्यवान वस्तू जसे की रोख रक्कम, दागिने किंवा इतर वस्तू एकाच ठिकाणी ठेवतात, असे करु नका. कोणतीही वस्तू चोरीला गेली तर एकत्र नुकसान होते. त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी प्रवासात सोबत घेणे टाळा.

हेही वाचा: Navratri 2022 : नवरात्रीत दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी 'ही' 4 फळे रोज खा

जर तुम्ही पहिल्यांदा सहलीला जात असाल तर तिथे कोणाकडूनह लिफ्ट घेऊ नका, अशा परिस्थितीत तुम्हाला धोका होण्याची शक्यता असते. आणि सहलीत व्यत्यय येऊ शकतो. कार किंवा बाईकने प्रवास करणार असाल तर सुरक्षेची काळजी घ्या. कारण अनेकवेळा अपघाताची शक्यता असू शकते.

प्रवासादरम्यान, लहान मुले सोबत असतील तर वाहनातून हात काढणार नाही याची काळजी घ्या. कारण मुलांच्या या निष्काळजीपणामुळे त्यांना दुखापत होऊ शकते. अनोळखी शहरात रात्री उशिरापर्यंत बाहेर पडू नका. दिवसा फिरण्यासाठी ठिकाणांना भेट द्या. रात्री चालणे किंवा प्रवास करणे, फिरणे तुमच्या धोकादायक ठरु शकते.

हेही वाचा: Astro Tips : तुम्ही वापरत असलेलं चप्पल किंवा बूटही तुमचे भाग्य बदलेलं, कसे पहा