पर्यटनासाठी सिक्कीमला जायचंय? मग, 'या' गोष्टी जरुर जाणून घ्या

sikkim
sikkimsikkim
Updated on
Summary

राज्याबद्दल अनेकांना काही महत्वाच्या गोष्टी माहीत नाहीत. त्याच काही ऐतिहासिक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारताच्या उत्तर-पूर्व भागात असलेल्या हिमालयाच्या एका भागात देशातील सर्वात सुंदर राज्य वसलं आहे. त्याचं नाव सिक्कीम. या राज्याचे क्षेत्रफळ साधारणत: 7096 किमीवर्गमध्ये पसरले आहे. सर्वात छोटे राज्य म्हणून ओळख असणाऱ्या राज्यांपैकी हे एक राज्य आहे. याजवळच्या प्रदेशात उत्तर-पूर्व भागात तिबेटची सीमा लागते. दक्षिण-पूर्व भागात भूटान तर पश्चिमेस नेपाळ हा देश आहे. गंगटोक ही या राज्याची राजधानी आहे. राज्याबद्दल अनेकांना काही महत्वाच्या गोष्टी माहीत नाहीत. त्याच काही ऐतिहासिक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sikkim
Sikkim
  • सिक्कीम राज्यात साधारणत: अकरा भाषा बोलल्या जातात. यामध्ये नेपाळी, सिक्कीमी, हिंदी, तमांग, लिंबु, नेवाडी, गुरुंग, मगर, राय सुनवर, इंग्रजी अशा भाषांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी भुटीया, ग्रोमा, माझी, शेरपा, मझवार, तिब्बेटी भाषा बोलल्या जातात.

  • भारतातील सर्वात मोठी कांचनजंगा याच प्रदेशात आहे. सिक्किम राज्य त्याच्या जैवविविधतेमुळे देशभर ओळखले जाते. उष्णकटिबंधीय वातावरणामुळे हे राज्य देशभर प्रसिद्ध आहे.

  • या राज्यात दरवर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय फुल महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये साधारणत: राज्यभरातून सुमारे ५००० प्रकारच्या फुलांची झाडे, प्रजाती दिसून येतात. यात 515 प्रकारचे दुर्मिळ ऑर्किड, ११ ऑक्स किस्मो, १६ शंकुधारी प्रजाती, 362 प्रकारचे फर्ण आणि 424 प्रकारचे औषधी वनस्पती आढळून येतात. येथे उपलब्ध असलेला ऑर्किड डेंडरोबियम हे महत्त्वाचे फुल आहे.

sikkim
निर्सगाचा अदभूत अनुभव घ्या..आणि`हर हर महादेव`बोलत शिरवेल चला
sikkim 1.jpg
sikkim 1.jpg
  • सिक्कीमचे 2011 या वर्षीचे साक्षरतेचे प्रमाण 82 टक्के होते. यामध्ये पुरुषांचे प्रमाण 87 टक्के तर महिलांचे प्रमाण 76 टक्के होते.

  • या राज्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साफसफाईची जबाबदारी. राज्यातील प्रत्येक नागरीक याविषयी विषेश जागरुक आहेत. त्यामुळे येथे तुम्हाला कमालीची स्वच्छता दिसेल. भारत सरकारकडून दिला जाणारा 2011-12 चा स्वच्छ राज्य पुरस्कार हा पुरस्कार सिक्कीमला जाहीर झाला होता.

  • सिक्कीम हे भारतातील असे एक राज्य आहे. तिथे स्थानिक लोक इतर देशांची निवासी आहेत. या राज्यात राहणारे बहुतेक लोक हे नेपाळचे आहेत.

  • सिक्कीम हे कृषिप्रधान राज्य आहे पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते येथील शेतकरी इलायची खाल्लं संत्री सफरचंद चहा इत्यादी पिके शेतीत घेतात दक्षिण भागात तांदळाचे पीक घेतले साठी आणि इलायची हे भारतातील सर्वांत जास्‍त किंमत दिली जाते

  • सिक्कीमचे अजून एक वेगळेपण आहे. हे एक असे राज्य आहे, जिथे मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार वेगळ्या प्रकारे दिसून येतात. साधारण येथे 200 धार्मिक स्थळे पाहायला मिळतात.

  • सिक्किममध्ये सर्व नागरिक सर्व हिंदू सण साजरे करतात. यामध्ये दिवाळी, दसरा इत्यादी सण साजरी करतात. परंतु तिबेटीयन यांचे नववर्ष लोसर हे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. जे डिसेंबरच्या मध्यला येते. यादरम्यान राज्यातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये साजरा केला जातो. यावेळी आठ दिवसांसाठी सरकारी कार्यालय किंवा पर्यटन केंद्रे बंद असतात.

sikkim
श्रावण विशेष : शिखर शिंगणापूर म्हणजे चैत्र, श्रावण महिन्यातील पर्वणीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com